Makeup Tips: तुमच्या त्वचेनुसार मेकअप 'कसा' असावा, वाचा एका क्लिकवर

Makeup Tips: त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप केल्यास परफेक्ट दिसाल, अन्यथा लूक खराब होऊ शकतो.
Makeup Tips
Makeup TipsSakal

perfect makeup look tips according to skin tone

अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. पण याचा अर्थ असा नाही की बाजारातून कोणत्याही प्रकारचे मेकअप प्रोडक्ट खरेदी करायचे आणि वापरायचे. मेकअप करणे हे एक आर्ट आहे. मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण चुकीचा मेकअप तुमचा लूक खराब करू शकतो आणि त्वचे संबंधित समस्या निर्माण करू शकतो. यासाठी मेकअप करताना त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मेकअप करणे आवश्यक आहे.

  • त्वचा प्रकार

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही असे फाऊंडेशन वापरा ज्यामध्ये हार्ड केमिकल किंवा अल्कोहोल नसेल. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी मॉइश्चरायझरवर आधारित फाउंडेशन निवडावे. जेणेकरुन कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी योग्य असेल. कारण ते त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तेलकट त्वचेच्या लोकांनी पावडर फाउंडेशन किंवा ऑइल फ्री लिक्विड फाउंडेशन वापरावे. यामुळे मुरुमाची समस्या निर्माण होत नाही.

  • त्वचेचा रंग

योग्य मेकअपसाठी फाउंडेशन सर्वात महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही मेकअप करताना योग्य फाउंडेशन निवडले पाहिजे. जे तुमच्या त्वचेशी जुळले पाहिजे. यासाठी तुम्ही चेहऱ्याचा रंग आणि अंडरटोन तपासला पाहिजे. असे केल्याने तुम्हाला कोणत्या प्रकारचा मेकअप योग्य दिसेल हे समजेल. यासोबतच तुम्ही ब्युटी एक्सपर्टचा सल्ला घेऊन त्वचेचा रंग कसा आहे हे जाणून घेऊ शकता.

Makeup Tips
Home Remedies: मसालेदार पदार्थांच्या सेवनाने पोटात उष्णता वाढलीय? 'या' घरगुती उपायांनी मिळेल थंडावा
  • त्वचेच्या रंगानुसार ब्लश वापरावा

सुंदर दिसण्यासाठी तुमच्या त्वचेच्या रंगानुसार ब्लश वापरावा. गोरी त्वचा असलेल्या महिला हलका गुलाबी ब्लश वापरू शकतात. जर तुमच्या त्वचेचा रंग हलका किंवा ऑलिव्ह असेल तर तुम्ही ऑरेंज किंवा पिंक ब्लश वापरू शकता. जर तुमच्या त्वचेचा रंग गडद असेल तर तुम्ही हलका जांभळा ब्लश वापरू शकता.

  • लिपस्टिक

त्वचेचा रंग तपासून लिपस्टिक वापरावी. यामुळे तुमचा लूक परफेक्ट दिसतो. त्वचा प्रकार कृष्णवर्णीय असेल तर डार्क लिपस्टिक वापरू शकता.

  • मेकअप कसा काढावा

सर्वात पहिले चेहरा सौम्य क्लीन्सरने स्वच्छ करावा.

नंतर फेसवॉशने स्वच्छ करावे.

यानंतर मॉइश्चरायझर लावावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com