Jacqueline Fernandez : पार्टीसाठी जॅकलीन सारखा पर्फेक्ट लूक हवाय? ट्राय करा या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez : पार्टीसाठी जॅकलीन सारखा पर्फेक्ट लूक हवाय? ट्राय करा या टिप्स

Perfect Party Look Tips : डिसेंबर महिना लागला की, सगळ्यांचे पार्टी नियोजन सुरू होते. सिक्रेट सांता असू दे, ख्रिसमस पार्टी असो किंवा अगदी न्यु इयर पार्टी, पार्टी म्हटली की, आपला लुक पर्फेक्टच असावा असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी कपड्यांची निवड हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो.

प्रत्येकालाच मित्रमैत्रिणींच्या गर्दीत आपण उठून दिसावं असं वाटत असतं. पण यात काही नवं, हटके ट्राय करायचं असेल तर जंपसूट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळेल आणि आकर्षक लुकपण मिळेल.

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

शिमरी जंपसूट

पार्टीसाठी नेहमी गडदच रंग हवेत असं काही नाही. तुम्ही जॅकलीन सारखा न्यूड शेडचा जंपसूट पण घालू शकतात. हॉल्टर नेक डिझाइन कंफर्टेबल आणि स्टाइलिश दिसतात. जर थंडी वाजत असेल तर यावर लेदर जॅकेट सुध्दा खूप सूट करते.

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

लेदर जंपसूट

थंडीच्या दिवसात लेदर जंपसूट हे उबदार आणि स्टायलिश दिसतात. जॅकलीनने घातलेला हा गुलाबी रंगाचा जंपसूट सुंदर दिसत आहे.

लेस लावलेला जंपसूट

लेस किंवा ब्रॉकेड कापडाचे डिटेलिंग क्लासी लुक देतो. जर तुम्हाला चमचमते कपडे टाळायचे असतील तर लेय लावलेले कपडे उठावदार दिसतात. त्यावर साजेशी ज्वेलरी आणि मेकअप तुमच्या लुकला चांगला उठाव आणेल.

डेनिम जंपसूट

जर तुम्ही डेट पार्टी किंवा सिनेमा प्लॅन करत असाल तर डेनिम जंपसूट फारच स्टायलिश लुक देतो. त्याखाली तुम्ही पम्प्स किंवा स्निकर्स घालू शकतात.