Perl Blouse Trend : दीपिका, काजोलनेही ट्राय केलेली पर्ल ब्लाऊजची डिझाईन एकदा पहाच!

लग्नात नवरीचं नाही तर सगळे तूमचंच कौतूक करतील
Perl blouse design
Perl blouse design esakal

लग्नात नवरीला पहायला तर सगळेच आलेले असतात. पण, करवली मात्र जरा दुर्लक्षितच होते. याचं कारण आहे ती नवरी इतके सजलेली नसते. पण तूम्हालाही तूमच्या मैत्रिणीचे, भावाचे, बहिणीचे लग्न अटेंड करावं लागणार आहे का?. त्या लग्नात सर्वांनी तूमच्याकडेच पहावे, असे वाटते का? मग आम्ही सांगतोय तेवढं करा.

लग्न सराईत मोठी उलाढाल कापड पेठांमध्ये होते. कारण, लग्नात सर्वांनाच कपडे, आहेर घेण्याची प्रथा आजही आपल्याकडे आहे. त्यामूळे करवली असलेल्या तूम्हीही स्वत:साठी खरेदी करताना परफेक्टच असं काहीतरी निवडा. ज्यामध्ये साडी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. त्यामूळे साडी घेताना पार्टीवेअर, डिझायनर घ्या. ज्यावर तूम्ही  डिझायनर ब्लाऊज शिवू शकता.

जेव्हा विषय ब्लाऊजचा येतो. तेव्हा तरूणी पर्ल म्हणजेच मोती डिझाईन करायला जास्त मागणी करतात. कारण बॅकलेस ब्लाऊजवर मोत्यांची डिझाईन असलेले ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेक अभिनेत्रींनीही हे डिझाईन ट्राय केलं आहे. या ब्लाऊजने दीपिका आणि काजोलचीही शोभा वाढवली आहे.

पर्ल बॅक ब्लाउजची डिझाईन अतिशय क्लासी दिसते. जर तुम्हाला तुमचा ब्लाउज परत अॅक्सेसरीजने सजवायचा असेल तर तो अशा प्रकारे मोत्यांनी सजवा.

Perl blouse design
Necklace Design Blouse : ब्लाऊज डिझाइनमधील नवा ट्रेंड; प्रत्येक साडीवर नेकलेस ब्लाऊज हवाच

ब्लाऊज धूत असताना त्यावर असलेली मोत्यांची माळ तूम्ही काढूनही ठेऊ शकता. कपडे धुल्यानंतर पुन्हा जोडू शकता.

Perl blouse design
Mangalsutra Designs : मंगळसूत्र वाट्यांच्या एकापेक्षा एक भारी डिझाइन्स
पांढरेशुभ्र मोती आणि गजरा
पांढरेशुभ्र मोती आणि गजरा esakal

तुम्ही पर्ल ब्लाउज क्वचितच पाहिले असतील. तुम्हाला स्टाइलमध्ये एक पाऊल पुढे राहायचे असेल तर या डिझाईन्सचा विचार करा.

Perl blouse design
Necklace Design : पहा एकापेक्षा एक सुंदर नेकलेस डिजाइन
ब्लाऊज आणि केसांसाठी मोती म्हणजे 'सोने पे सुहागा'
ब्लाऊज आणि केसांसाठी मोती म्हणजे 'सोने पे सुहागा'esakal

या पॅटर्नची खासियत म्हणजे मोत्याने ब्लाउजच्या मागील भाग पूर्णपणे झाकलेला असतो. त्यामूळे बॅकलेस आवडत नसेल तर अशी डिझाईन तूम्ही करू शकता.

Perl blouse design
Watches Designs : तुमच्या हातात कोणती वॉच सुंदर दिसणार? पहा भारी डिझाइन्स
हे ब्लाऊज बॅकलेस असूनही बॅकलेस वाटत नाही
हे ब्लाऊज बॅकलेस असूनही बॅकलेस वाटत नाहीesakal

यासारख्या लहान मोत्यांनी तूमची कोमल पाठ अधिकच आकर्षक दिसेल. जर बॅक ब्लाउज डिझाईन डीप नेक असेल तर हे डिझाईन खूप सुंदर दिसेल. हे तुमच्या साडी नेसण्याच्या स्टाइललाही सुंदर लुक देईल.

Perl blouse design
Blouse Designs : पहा एकापेक्षा एक हटके ब्लाउजच्या डिझाइन्स
मोती आणि व्हाईट साडी म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन
मोती आणि व्हाईट साडी म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशनesakal

स्वतंत्रपणे, मोत्यांसह साडी ब्लाउज अॅक्सेसरीज अगदी कमी किमतीत बाजारात ऑनलाइन शॉपिंगमध्ये उपलब्ध आहेत, जे तुम्ही कोणत्याही ब्लाउजसोबत घालू शकता. हे डिझाईन एकदा वापरून पाहिल्यावर खूप सुंदर दिसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com