
Trendy Blouse : लग्नसराईत वाढतोय प्रत्येक साडीवर मॅच होतील अश्या 3D ब्लाऊजचा ट्रेंड!
आजकाल साध्या सिंपल साडीवर डिझायनर ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आहे. अभिनेत्रींचा हा आवडता ट्रेंड सध्याच्या लगीनसराईतही येऊन पोहोचला आहे. नवरीचे असो वा करवली म्हणून मिरवणाऱ्या पोरींचे सगळीकडे चर्चा फक्त तूमच्या ब्लाऊजचीच आहे.
लग्नात साडी हलकी का असेना पण काय ब्लाऊजची डिझाईन होती, असं कौतूक ऐकायचं असेल तर 3D डिझाईनचा विचार नक्की करा. कारण सध्या साडीसोबत डिझायनर ब्लाउज घालण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. विशेषतः थ्रीडी प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी तसेच थ्रीडी कटवर्क असलेले ब्लाउज खूप लोकप्रिय होत आहेत.

अशा ब्लाऊजने साधी साडीही अधिकच उठून दिसते
या प्रकारचा ब्लाउज तुम्ही कोणत्याही प्रसंगात कॅरी करू शकता. यासाठी तुम्हाला फार भारी किंवा डिझायनर साडीची गरज भासणार नाही. या प्रकारचा ब्लाउज तुम्ही कोणत्याही कलरच्या साध्या साडीसोबत कॅरी करू शकता.

फ्लॉवर डिझाईन अधिकच खुलून दिसते
तुम्ही तुमच्या आवडीच्या डिझाईन्सच्या 3D डिझाईन बनवू शकता. आजकाल थ्रीडी एम्ब्रॉयडरीमध्ये रेशमी धाग्यांसह त्याला ज्वेलरी इफेक्टही दिला जातो. बाजारात तुम्हाला असे ब्लाउज रेडीमेडही मिळतील. कोणत्या चांगल्या फॅशन स्टोअरमधून तुम्ही ते खरेदी करू शकता.

3D ब्लाऊजचा ट्रेंड
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला 3D प्रिंटेड ब्लाउज फक्त सिल्क किंवा सॅटिन सारख्या कपड्यांमध्येच नाही तर ऑर्गेन्झा सारख्या कपड्यांमध्ये देखील सापडतील.
तुम्हाला तुमच्या साडीच्या फॅब्रिकच्या आधारे ब्लाउजचे फॅब्रिक निवडावे लागेल. साड्यांसोबतच हे ब्लाउजही तुम्ही वेस्टर्न आउटफिट्ससोबत कॅरी करू शकता. लांब स्कर्ट किंवा प्लाझो पँटसोबत कॅरी करू शकता.

प्लेन ब्लाऊजवर अशी सिंपल डिझाईन सूट होते