सतत तोंडातले येणे; हे एखाद्या गंभीर आजाराच लक्षण असु शकतं,तोंडाल्यावर घरगुती उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Persistent nausea

सतत तोंडातले येणे; हे एखाद्या गंभीर आजाराच लक्षण असु शकतं,तोंडाल्यावर घरगुती उपाय

तोंडातल आल्यावर सगळं खाणं पिणे कठीण हाऊन जाते. तोंडातल येण्याची अनेक कारणे आहेत. खुप वेळा अपुरी झोप, मानसिक ताण, कमी पाणी पिल्यामुळे सुध्दा तोंडातल येऊ शकतं.शरीराच्या आतमध्ये चाललेल्या प्रोसेस मध्ये काही बाधा आली की शरीराच्या इंद्रियांवर त्याचा परिणाम दिसायला सुरवात होते हे वेगळं सांगायला नको.

तोंड येणे हे शारीरिक बदलाची एक झलक असते. तोंडात हलके दुखायला लागते आणि थोडीफार सूज यायला सुरुवात होते.मुख्य म्हणजे तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे प्रकार घडतात. कारण तोंडाच्या आतील त्वचा ही अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असतेवैद्यकीय औषधोपचार करून यावर आळा घालू शकतो.पण सतत होणाऱ्या या अल्सर च्या त्रासाला रक्त तपासणी करून कारण शोधणे गरजेचे असू शकते.

● आता बघू या तोंडातल येणे म्हणजे नेमके काय?

तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाली की हा त्रास सुरू होतो. तोंडाच्या आतील त्वचेला वैज्ञानिक भाषेत म्युकस मेम्बरेन म्हणतात. याला झालेली इजा प्राणघातक तर नसते पण सहन करण्याइतपत सुद्धा नसते. गाल किंवा ओठांच्या आतल्या बाजूस या अल्सरचे होण्याचे प्रमाण जास्त असते.

● तोंडातल येणे किंवा अल्सर याचे नेमकी लक्षणे काय आहेत आता ते बघू या ?

आपल्या तोंडाच्या आत हलक्या लाल रंगाचे चट्टे, बोलताना किंवा काही खाताना प्रचंड वेदना होणे, तोंडात सतत जळजळ होणे, तोंडातली लाळ सतत जमा होणे, थंड खाद्यपदार्थ घेतल्यास दाह कमी होणे. तोंडातल येणे तसे आठवड्याभरात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत योग्य पथ्य पाळल्यावर बरे होऊन शकते. परंतु जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Health Tips : ॲसिडिटीचा त्रास होतोय? ट्राय करा 'हे' ५ रामबाण उपाय

● आता बघू या तोंडातल येण्याच्या मागचे नेमके कारण काय आहेत ते?

तोंडातल येणे हे एक प्रकारे नाही म्हटले तरी शरीरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचे प्रतीक आहे. या उष्णता वाढण्याचे अनेक कारणे असू शकतात. जसे, एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषध घेणे आणि त्याचा साईडइफेक्ट. तंबाखू, चहा, कॉफी सारखे निकोटिन युक्त पदार्थांचे अतिसेवन. अतिप्रमाणात तेलकट आणि मसालेदार जेवणाचे-पदार्थाचे सेवन.पचना संबंधित त्रास असल्यावर सुद्धा तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते.विशेष करून पोट साफ न होण्याच्या तक्रारी. आणि सर्वाधिक प्रभाव पडतो तो जीवनसत्त्वांचा अभावामुळे.

● आता तोंडातल आल्यावर आपण उपाय म्हणून काय करू शकतो?

तोंड येणे किंवा तोंडाच्या अल्सर ला घरघुती उपचार सुद्धा उपलब्ध आहेत. पण डॉक्टरांचा सल्ला घेणे निश्चितचं उजवे ठरेल. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे. तोंडाच्या स्वच्छतेसाठी अँटीसेप्टिक लिक्विड आणि जळजळ किंवा दाह शमवण्यासाठी मलम लावणे. सतत अल्सर का होत आहे याचे निदान झाल्यावर त्या विशिष्ट आजारावर योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी. संक्रमण मार्गे जर अल्सर होत असेल तर तत्सम प्रतिजैविक औषधांचा वापर करावा. व्हिटॅमिनची कमतरता असल्यास त्यासंबंधीत योग्य त्या गोळ्या. उदाहरणार्थ व्हिटॅमिन बी साठी बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या. तोंडाच्या कर्करोगीसाठी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे अनिवार्य आहे. शरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.

हेही वाचा: Health Tips: 'या' टिप्स फॉलो करा, कामाच्या मधात तुम्हाला येणारा आळस आणि झोप आपोआप होईल दूर

● तोंडातल आल्यावर चुकूनही या गोष्टी करू नये?

आहारात मसालेदार आणि आम्लयुक्त पदार्थ घेणे टाळावे. दैनंदिन जिवनातील सोड्याचा वापर अगदी कमीत कमी करावा.कटाक्षाने धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. जास्त गरम आणि जास्त थंड पेय/पदार्थ खाण्याचे टाळावे. दातांना,हिरड्याला आणि पर्यायाने तोंडाला इजा होणार नाही अशा टूथब्रश आणि पेस्टचा वापर टाळावा.

● तोंडातल येऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी ?

तोंडातल येण्याची लक्षणे जर दिसायला लागली तर आहारात कमी दाह आणि कमी तिखट पदार्थांचा समावेश करावा. नारळपाणी, थंड दूध-दही सारख्या पदार्थांचा वापर वाढवावा. आपल्या शरीराला लागणारे संपूर्ण पोषक द्रव्य आपल्या आहारातून शरीरात जातील असा सकस आहार घ्यावा. दररोज जेवणाची वेळ ठरवून त्यानुसार जेवण करावे. व्हिटॅमिन ए,सी आणि ई सारख्या अँटीऑक्सिडंट ने भरपूर अशा फळांचा वापर आहारात करावा. पपई, आंबे, गाजर, बदाम, आवळा इत्यादी. सगळ्या महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्यावी जागरण टाळावे.दररोज भरपूर पाणी प्यावे. ज्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होईल आणि बॉडी टेम्परेचर मर्यादेत राहील. आणि मुख्य म्हणजे तोंडाची स्वछता ही नियमित करावी.

Web Title: Persistent Nausea It Can Be A Sign Of A Serious Illness Home Remedy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..