Menopause Effects : मेनोपॉजनंतरही लैंगिक जीवन राहू शकते नॉर्मल? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Menopause Effects

Menopause Effects : मेनोपॉजनंतरही लैंगिक जीवन राहू शकते नॉर्मल? जाणून घ्या

Physical Relation after Menopause : मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती यात महिलांची पाळी थांबते. ज्यातून प्रजनन क्षमता थांबल्याचं निर्देशीत होतं. साधारणतः ४०-५० च्या वयात महिलांना रजोनिवृत्ती होते. जसं वय वाढत जातं तसं प्रजनन क्षमता कमी होत जाऊन थांबते. त्याप्रमाणे वयानुसार महिलांमधली शारीरिक संबंध बनवण्याची इच्छापण कमी होऊ लागते.

पण काही केसेसमध्ये असं बघायला मिळालं आहे की, मेनोपॉजनंतरही काही महिलांचं सेक्स लाइफ बरीच चांगली आहे. तर जाणून घेऊया की, मेनोपॉजनंतरही सेक्स लाइफ चांगली कशी ठेवता येईल.

हेही वाचा: Relationship Tips : जोडीदारासोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळलाय? अमेरिकन कपल थेरपी करेल मदत

मेनोपॉज सुरू झाल्यानंतरची लक्षणं

 • अनियमित पाळी

 • वजन वाढणं

 • कोरडी रूक्ष त्वचा

 • केस गळणं.

हेही वाचा: Relationship Tips : 'या' ७ औषधांनी कमी होते लैंगिक इच्छा, काय सांगतो अभ्यास?

भावनात्मक बदल

 • मूड स्विंग्ज

 • राग येणं, चीडचीड वाढणं

 • उत्साह कमी होणं.

 • एकाग्रता कमी होणं.

 • प्रीमेंस्ट्रअल सिंड्रोम बिघडणं

 • कामवासनेत बदल

 • अनिद्रा

 • चिंता, एन्झायटी

हेही वाचा: Relationship Tips: शारीरिक संबंधासाठी महिला उत्सुक आहे, हे कसं ओळखायचं?

या परिस्थितीनंतरही तुम्ही काही गोष्टींनी सेक्स लाइफ सुधारू शकतात.

 • सेक्स विषयी जोडीदाराशी बोला. आपला दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करा.

 • बऱ्याचदा वयाच्या एका टप्प्यानंतर याविषयावर लोक बोलणं बंद करतात. पण तुम्ही मेनोपॉजनंतरही या विषयात इंट्रेस्ट दाखवू शकतात.

 • जेव्हा मिड एजमध्ये येतात तेव्हा याविषयावर बोलणं टाळतात, त्यामुळे डिप्रेशन येतं.

हेही वाचा: Relationship Tips : नात्यातील हे सिक्रेट्स कधीच कोणाला सांगू नका ; होतील वाईट परिणाम

 • मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे औषध तुमच्या सेक्स लाइफवर परिणाम करतात. त्याला पर्याय शोधावा.

 • नियमित व्यायाम करा, सुदृढ रहा, सकास आहार घ्या आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

 • आपल्या ताण आणि चिंतांना दूर करा. घरातल्या, कामावरच्या जबाबदाऱ्यांचा, चिंतांचा तुमच्या सेक्स लाइफवर परिणाम होणार नाही अशी काळजी घ्या.

 • मद्याचं सेवन कमी करा.

 • तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.