
Indian Superfoods: शेवगा हे खूप पौष्टिक आहे. यात भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आपण याचा उपयोग भाजीत, सूपमध्ये, पाण्यात किंवा पावडर स्वरूपातही करू शकतो. १९ एप्रिल रोजी 'फिगरिंग आउट विथ राज शमानी' या पॉडकास्टमध्ये ओझिवा न्यूट्रिशन या कंपनीचे सह-संस्थापक मिहीर गदानी यांनी सांगितले की, शेवगा हे भारतीयांसाठी टॉप 3 सुपरफूड्सपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्या आहारात मोरिंगाचा समावेश करतात.