
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर भाषण दिले आहे.
त्यांच्या पोशाखात देशभक्ती आणि सांस्कृतिक वारसा दर्शवला.
मोदींच्या या खास लूकने भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला अधोरेखित करत सोशल मीडियावर चर्चा सुरू
PM Modi's Independence Day 2025 Look: भारताच्या 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर आयोजित समारंभात आपल्या खास पारंपरिक पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधले. मोदींच्या या अनोख्या लूकची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा फेटा आणि पारंपरिक पोशाख चर्चेचा विषय ठरला, जो भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मोदींच्या पोशाखाची निवड नेहमीच देशातील हस्तकला आणि परंपरांचा गौरव करते. लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणासह हा लूक स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला आणखी रंगत आणणारा ठरला. या पोशाखाने देशभरातील लोकांमध्ये उत्साह निर्माण केला असून, सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.