झूम : इलेक्ट्रिक स्कूटरचा स्वीकारार्ह पर्याय

पेट्रोलवर धावणाऱ्या स्कूटर्सना इलेक्ट्रिक स्कूटर व्यवहार्य पर्याय ठरू लागला आहे. या स्कूटर पर्यावरणपूरक आहेतच, शिवाय दीर्घकाळात आर्थिक दृष्ट्याही अनुकूल ठरतात.
Electric Scooter
Electric ScooterSakal
Summary

पेट्रोलवर धावणाऱ्या स्कूटर्सना इलेक्ट्रिक स्कूटर व्यवहार्य पर्याय ठरू लागला आहे. या स्कूटर पर्यावरणपूरक आहेतच, शिवाय दीर्घकाळात आर्थिक दृष्ट्याही अनुकूल ठरतात.

पेट्रोलवर धावणाऱ्या स्कूटर्सना इलेक्ट्रिक स्कूटर व्यवहार्य पर्याय ठरू लागला आहे. या स्कूटर पर्यावरणपूरक आहेतच, शिवाय दीर्घकाळात आर्थिक दृष्ट्याही अनुकूल ठरतात. कारण पेट्रोलवर धावणाऱ्या स्कूटर कंपन्या मायलेजबाबत केवळ दावे करतात. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर फायदेशीर ठरू शकतात. स्कूटर खरेदीसाठी सरकार अनुदानही देते. सर्वंकष फायदाच फायदा असल्याने इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय अलीकडे स्वीकारला जाऊ लागला आहे.

कार्यक्षम स्कूटर निवडा

दररोज प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये गुंतवणूक उत्कृष्ट निवड ठरू शकते. कोणतीही स्कूटर निवडताना विशिष्ट मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. एखादी इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यापूर्वी तिचा आपण कसा वापर करणार, त्यामध्ये आपल्याला कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची एक मूलभूत कल्पना प्रत्येकाला असते. परवडण्याजोगी किंमत, तिची ड्रायव्हिंग रेंज, बॅटरीची क्षमता, ताकद, सोयी आणि सुविधा यांपैकी कशाची गरज आपल्याला अधिक आहे, हे प्रत्येकाला समजते. याचा अंदाज घेऊन स्कूटरची निवड करणे योग्य ठरते.

तंत्रज्ञान आणि बॅटरी

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पैसा गुंतवताना तिचे तांत्रिक तपशील नीट समजून घेणे गरजेचे आहे. बॅटरी हा इलेक्ट्रिक स्कूटरचा महत्त्वपूर्ण भाग, बॅटरी चांगले काम करत नसल्यास त्रास होऊ शकतो. बॅटरीचे दोन प्रकार पडतात. ली-आयन आणि लीड अॅसिड बॅटरी. इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज किती व ती किती वेग गाठू शकेल हे बॅटरीच्या क्षमतेवरून ठरते. बॅटरी वॉटरप्रूफ, शॉकप्रूफ किंवा बॅटरी रिप्लेस करण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ली-आयन बॅटरी या सर्वांत कार्यक्षम आहेत. बहुतांश स्कूटरमध्ये याच प्रकारच्या बॅटरीचा वापर होतो.

वापरलेल्या स्कूटरचाही पर्याय...

  • बहुतांश ग्राहक वापरलेल्या दुचाकीही कमी किमतीत खरेदी करतात. इलेक्ट्रिक स्कूटरमध्येही हा पर्याय उपलब्ध आहे. अशा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी बॅटरी, फीचर्स, तंत्रज्ञान, मोटरची क्षमता आदी बाबी पडताळून खरेदी कराव्यात.

  • भारतीय बाजारात ओला एस१, टीव्हीएस आय-क्यूब, अॅथर ४५० एक्स, हिरो इलेक्ट्रिक, बजाज चेतक, बाऊन्स इन्फिनिटी, ओकिनोव्हा या सारख्या विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपये या किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

  • वापरलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्तम देखभाल केलेल्या असल्याने वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात. क्रेडआरमध्ये वापरलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची मोठी श्रेणी उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com