झूम : सायकलचा ‘टँडेम सायकल’ प्रवास

सायकल, तिची गरज, महत्त्व, काळानुरूप तिचा वापर कसा बदलत गेला, हे आपण सारे जाणतोच. सायकलीचे प्रकारही बरेच. ३ जून हा ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
cycle tandem journey
cycle tandem journeysakal
Summary

सायकल, तिची गरज, महत्त्व, काळानुरूप तिचा वापर कसा बदलत गेला, हे आपण सारे जाणतोच. सायकलीचे प्रकारही बरेच. ३ जून हा ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जातो.

सायकल, तिची गरज, महत्त्व, काळानुरूप तिचा वापर कसा बदलत गेला, हे आपण सारे जाणतोच. सायकलीचे प्रकारही बरेच. ३ जून हा ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आपण एकाहून अधिक, म्हणजेच दोन जण चालवू शकतात अशा ‘टँडेम’ (Tandem) सायकलची माहिती घेणार आहोत. पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असणारी ही सायकल परदेशात प्रसिद्ध असली, तरी आता भारतातही हळू हळू लोकप्रिय होत आहे.

‘टँडेम’ म्हणजे दोन चालक एकावेळी चालवू शकतात अशी सायकल. सामान्य सायकलप्रमाणेच ती चालवावी लागत असली, यात दोन्ही चालकांमध्ये चांगले कोऑर्डिनेशन अर्थात समन्वय असावा लागतो. तिचे पेडल समान गतीने फिरवावे लागतात. शिवाय त्रिज्या (रेडियस) जास्त असल्याने वळण घेताना एखाद्या कारप्रमाणेच या सायकलचा अंदाज (जजमेंट) घ्यावा लागतो. एखाद्या विमान/जहाजाच्या कॅप्टनप्रमाणेच या सायकलचा चालक भूमिका बजावतो. मागील चालक केवळ सायकलला पेडल देऊन कॅप्टनला साथ देतो; परंतु चालकाला पुढील सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात.

टँडेम सायकल तशी परदेशात लोकप्रिय असली तरी भारतातही तिचे चाहते आहेत आणि यातील विशेष बाब म्हणजे, भारतात टँडेम सायकलद्वारे सर्वाधिक २०० किलोमीटरचे (वडोदरा) अंतर १२ तास २७ मिनिटांत पार करून ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’चा किताब पटकावणाऱ्या शीतल बांबुळकर (मुंबई) आणि डॉ. मीरा वेलणकर (बंगळूर) या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी डिसेंबर २०१५मध्ये हा विक्रम नोंदवला होता. फ्रान्समधील ऑडेक्स पर्शियन क्लब अंतर्गत स्वत:ची क्षमता जाणून घेण्यासाठी केली जाणारी ही ‘एण्ड्युरन्स’ राईड होती. या राईडची भारतात नोंदणी करून त्यांनी हा विक्रम नोंदवला होता.

शीतल बांबुळकर या भारतातील पहिल्या इंटरनॅशनल सुपर रॉण्डोनर आहेत. ज्यामध्ये सायकलस्वाराला जगातील कोणत्याही चार देशात दीर्घ सायकल प्रवास करायचा असतो. टँडेम सायकलच्या अनुभवाबाबत शीतल सांगतात, की दोन चालक असल्याने ही सायकल चालवण्यासाठी पुरेसा सराव करावा लागतो. दोघांमध्ये चांगला समन्वयही असणे अत्यंत आवश्यक आहे. ही सायकल वजनाने जड असते. त्यातील तांत्रिक बाबी माहीत असणे आवश्यक आहे. भारतात ही सायकल हळूहळू लोकप्रिय होत आहे. एक छंद म्हणून ही टँडेम सायकल खरेदी केली जाते, परंतु आकारामुळे तिचा सांभाळ करणे तितकेच आव्हानात्मक असल्याचे शीतल यांनी सांगितले.

पायलट आणि स्ट्रोकर

टँडेम सायकल चालवतो तो पायलट आणि मागे बसणारा स्ट्रोकर. पायलटला हँडलिंग, पेडलिंग, ब्रेकिंग, गिअर शिफ्टिंग आणि एवढ्या मोठ्या आकाराच्या या सायकलची व्यवस्थित हाताळणी करावी लागते. स्ट्रोकर सायकलला अधिक ताकद देतो आणि या दोघांना एकत्र मिळूनच ही सायकल चालवायची असते. या सायकलमध्ये पेडलला जोडलेले क्रँक वेगळे असले, तरी ड्राईव्ह चैन एकच असते. सायकलीचे पेडल एकमेकांना जोडलेले असल्याने ते या दोघांना समान वेगात फिरवावे लागतात. या सायकलची फ्रेम मोठी असल्याने ती वजनदार असते. टँडेम सायकल कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर चालवू शकतो.

‘टँडेम’बद्दल आणखीही...

  • टँडेम सायकल ही दोघांना चालावी लागते. परंतु त्यात तीन व्यक्तींना एकावेळी

  • चालवता येणारी सायकलही बाजारात उपलब्ध आहे.

  • ही सायकल दूरवरील निसर्गरम्य वातावरणात पर्यटनासाठीही वापरली जाते. साहसी राइड करण्यासाठी तिचा डोंगराळ भागातही वापर होतो.

  • टँडेम सायकलचे विविध प्रकार आहेत. त्यातील माऊंटन, रोड बाईक्स हायब्रीड बाईक्स आणि कम्फर्ट बाईक्स आदी प्रकार लोकप्रिय आहे.

सुरक्षाही महत्त्वाची....

  • भारतातीयांना सायकलिंगचे आरोग्यविषयक फायदे आता समजू लागले आहेत. पूर्वी सायकल गरज म्हणून चालवली जायची. आता शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी किंवा छंद म्हणून सायकल चालवण्याचा ट्रेंड आला आहे. त्यातही इतर वाहनचालकांकडून सायकलस्वारांना आदर मिळत नाही.

  • एखादा नियमित सायकलस्वार कधीही हेल्मेटसह इतर सुरक्षात्मक बाबी परिधान केल्याशिवाय सायकल चालवू शकत नाही. सायकलस्वारांनाही वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असते. शहरी भागात सायकल क्लब असतात, ज्याद्वारे सुरक्षा, वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com