झूम : किआ कॅरेन्स : फीचर्सचे भरगच्च पॅकेज

किआ कॅरेन्स! आताच्या स्पर्धात्मक युगात पारंपरिक ठेवणीच्या कार पाहण्याची सवय असताना थोडीशी हटके आणि डोळ्यांत चटकन भरणारी ही ‘एसयूव्ही’ श्रेणीतील कार.
kia carens car
kia carens carSakal
Summary

किआ कॅरेन्स! आताच्या स्पर्धात्मक युगात पारंपरिक ठेवणीच्या कार पाहण्याची सवय असताना थोडीशी हटके आणि डोळ्यांत चटकन भरणारी ही ‘एसयूव्ही’ श्रेणीतील कार.

किआ कॅरेन्स! आताच्या स्पर्धात्मक युगात पारंपरिक ठेवणीच्या कार पाहण्याची सवय असताना थोडीशी हटके आणि डोळ्यांत चटकन भरणारी ही ‘एसयूव्ही’ श्रेणीतील कार. विशेषत: समोरून पाहिल्यास ग्रीलची डिझाईन, हेड लॅम्पची आधुनिक ठेवण इतर एसयूव्हींपेक्षा तिला वेगळेपण मिळवून देते. बाजूने पाहिल्यास एका एसयूव्हीचे जणू भरगच्च पॅकेज. पाठीमागील लुकही तितकाच आकर्षक. या कारची राइड घेण्याची संधी गेल्या आठवड्यात मिळाली. एसयूव्हींच्या तीव्र स्पर्धेत कॅरेन्सच्या रूपात कारप्रेमींना आणखी नवा पर्याय या नवीन वर्षात नक्कीच मिळाला आहे.

कॅरेन्स ‘एमपीव्ही’ श्रेणीतील वाटत असली, तरी किआने तिला ‘एसयूव्ही’ म्हणूनच बाजारात आणली आहे. तिच्या किमतीबाबत अजूनही सस्पेन्स ठेवला आहे. कॅरेन्सची पेट्रोल १.४ टी-जीडी आय (७ डीसीटी) प्रकारातील कार चालवण्याचा अनुभव घेतला. तिची रस्त्यावरील कामगिरीही जबरदस्त आहे. अर्थात, बाजारातील तगडी स्पर्धा पाहता अशा कामगिरीची पुरेपूर खबरदारी किआने घेतलेली दिसते. दृश्यमानता, ताकदीच्या बाबतीतही तक्रार करण्यासारखे काही नाही. कॅरेन्सची आवडलेली बाब म्हणजे, कार अधिक वेगात असली तरी ती नियंत्रित राहते, अगदी वळणदार रस्त्यावर एखाद्या वाहनाला ओव्हरेटक करताना ब्रेक दाबण्याची वेळ आल्यास याची प्रचिती येते. ती स्थिर राहते, लेन सोडत नाही.

१६ इंची टायर, १९५ मिलिमीटरच्या ग्राऊंड क्लिअरन्ससह कॉइल स्प्रिंग सस्पेंशन्समुळे कारमधून धक्के विरहित प्रवास होतो. या कारची जमेची बाजू म्हणजे २७८० मिलिमीटर व्हील बेसचा फायदा तिसऱ्या रांगेतील प्रवाशाला होतो. या रांगेत प्रवाशाला पाय मोकळे करण्यास आटोपशीर जागा उपलब्ध होते. पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील प्रवाशांना प्रशस्त जागा आहेच. त्याजोडीला दमदार वातानुकूलन यंत्रणा असल्याने लांबच्या प्रवासाचा आनंद घेता येतो. एकूणच, या कारच्या किमतीबाबत सस्पेन्स ठेवला असला, तरी १२ ते १८ लाखाच्या घरात तिची किंमत असावी.

सुरक्षित प्रवासासाठी...

कॅरेन्समध्ये ६ एअर बॅग, इलेक्ट्रिक स्टेबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल, बीएएस, डीबीसी, एबीएस, चारही चाकांना डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, रिअर पार्किंग सेन्सर्स आदी सुरक्षात्मक फीचर्स दिले आहेत.

आधुनिक फीचर्स

किआ मोटर्स तिच्या आधुनिक फीचर्ससाठी ओळखली जाते. कॅरेन्समध्येही किआ कनेक्टसह ६६ स्मार्ट फीचर्स दिले आहेत. कॅरेन्सचा डॅशबोर्ड डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर (२६.०३ सेमी एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन), काळ्या रंगाच्या शेडमध्ये दिला आहे. व्हेंटिलेटेड सिट्स, सर्व रांगांसाठी एसी व्हेंट्स, विषाणूंपासून संरक्षण देणारे एअर प्युरिफायर, ८ स्पीकरसह बोस प्रीमियम साऊंड सिस्टिम, टच पॅड स्वीच, ड्रायव्हिंग मोड्स (स्पोर्ट््‌स, नॉर्मल, ईको), वायरलेस चार्जर, स्कायलाइट सनरूफ, वन टच ईझी इलेक्ट्रिक टंबल ज्यामुळे तिसऱ्या रांगेत जाण्याचा मार्ग सुकर होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com