झूम : प्रीमिअम अन् लक्झरियस ‘स्लाव्हिया’

श्‍कोडा इंडिया कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून सेदान प्रकारातील कार बाजारात आणून भारतीय ग्राहकांवर प्रीमिअम युरोपिअन फिल, मोकळी-ढाकळी जागा, आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने वेगळी अशी छाप सोडली आहे.
Slavia Car
Slavia CarSakal
Summary

श्‍कोडा इंडिया कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून सेदान प्रकारातील कार बाजारात आणून भारतीय ग्राहकांवर प्रीमिअम युरोपिअन फिल, मोकळी-ढाकळी जागा, आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने वेगळी अशी छाप सोडली आहे.

सेदानच्याच किमतीत एसयूव्ही श्रेणीतील कार येत असल्याने भारतीय कारप्रेमी आता एसयूव्हीमध्येच विविध पर्याय शोधू लागले आहेत; परंतु भारतात चांगला जम बसवलेल्या आणि पारंपरिक ग्राहक वर्ग असलेल्या ‘श्‍कोडा’ या युरोपियन कंपनीने कारप्रेमींचे लक्ष पुन्हा सेदानकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रॅपिडच्याच धरतीवर गेल्या वर्षीच्या अखेरीस ‘स्लाव्हिया’ ही प्रीमिअम लक्झरियस सेदान श्रेणीतील कार भारतात दाखल करण्यात आला. या कारच्या एन्ट्रीद्वारे श्‍कोडाने सेदान श्रेणीत चुरस वाढवली आहे. या कारची नुकताच राईड केली. कशी आहे ही कार, याबद्दल सविस्तर....

श्‍कोडा इंडिया कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून सेदान प्रकारातील कार बाजारात आणून भारतीय ग्राहकांवर प्रीमिअम युरोपिअन फिल, मोकळी-ढाकळी जागा, आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने वेगळी अशी छाप सोडली आहे. स्लाव्हियाच्या बाबतीतही श्‍कोडाने आपली हीच परंपरा कायम ठेवली. स्लाव्हिया १.० लिटर टीएसआय आणि १.५ लिटर टीएसआय या दोन इंजिन प्रकारासह मॅन्युअल आणि ऑटोमेटिक (डीएसजी) ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहेत. स्लाव्हियाचे ॲक्टिव्ह, स्टाइल आणि ॲम्बिशन हे तीन व्हेरिअंट. ९९९ आणि १४९८ सीसी इंजिन क्षमतेत ही कार येते. या कारची एक्स शोरूम किंमत १०.६९ लाख ते १७.७९ यादरम्यान ठेवण्यात आली आहे. शहरानुरूप तिच्या किमतीत बदल होणार.

आकर्षक डिझाइन

स्लाव्हियाच्या ‘स्टाइल’ मॅन्युअल ट्रान्समिशन, १.५ लिटर टीएसआय प्रकारातील कारची राइड घेतली. कारचे फुलपाखराच्या आकारातील पुढील ग्रील, हेडलॅम्प, टेल लाइटची ठेवण तितकीच आकर्षक आणि डोळ्यात भरणारी. कारमध्ये बसल्यानंतर श्‍कोडाच्या प्रीमियमनेसची अनुभूती देणारा इंटेरियर, कार चालवताना येणारा अनुभव टिपिकल युरोपियन कारची फिलिंग देतो. पाठीमागील आसनावर मध्यम शरीरयष्टीचे तीन प्रवासी अगदी आरामात बसू शकतात. इतर सेदान कारच्या तुलनेत रस्त्यावरील प्रेझेन्स आणि पकड टिपिकल श्‍कोडाची कार चालवल्याची अनुभूती देते. वळणदार, घाटमाथा, खडबडीत रस्त्यांवरही ही कार कामगिरीच्या बाबतीत नाराज करीत नाही. ब्रेकिंग यंत्रणाही उत्तम आहे. स्लाव्हियामध्ये टोरनाडो रेड, कँडी व्हाइट, कार्बन स्टील, रिफ्लेक्स सिल्व्हर, क्रिस्टल सिल्व्हर आदी रंगांचे पर्याय दिले आहेत. शिवाय, आवश्यक तिथे क्रोमचा वापर केल्याने ही कार अधिक उठावदार दिसते. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक कार चालवण्यात वेगळी मजा असते. काहींना ऑटोमॅटिकच्या तुलनेत मॅन्युअल ट्रान्समिशन कार जास्त आवडते. अशा कारप्रेमींसाठी स्कोडा स्लाव्हिया उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण दमदार इंजिन, झटकन पकडणारा वेग, तत्काळ थंड करणारी वातानुकूलन यंत्रणा, तितकीच जबरदस्त साऊंड सिस्टिम लांबचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर करण्याची खात्री देते.

सुरक्षात्मक आणि इतर वैशिष्ट्ये

सहा एअरबँग, एबीएससह ईबीडी, मल्टी कोलिजन ब्रेक, पार्क डिस्टन्स कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉकिंग कंट्रोल, ट्रँक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल स्टार्ट असिस्ट, अँटी स्लीप रेग्युलेशनसह रोलओव्हर प्रोटेक्शन, आइसोफिक्स सीट

शिवाय एलईडी लॅम्प, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल, पुढील दोन्ही व्हेंटिलेटेड सीट, १० इंचीचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्कोडा ८-स्पीकर ऑडिओ सिस्टिम, की-लेस एंट्री, सनरूफ आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com