झूम : टिगॉर सीएनजी; दमदार अन् सुरक्षितही...

बहुप्रतिक्षेनंतर टाटा मोटर्सने पहिल्यांदाच टिगॉर आणि टिआगो या कार सीएनजी (आय-सीएनजी) श्रेणीत बाजारात दाखल केल्या.
Tigor CNG Car
Tigor CNG CarSakal
Summary

बहुप्रतिक्षेनंतर टाटा मोटर्सने पहिल्यांदाच टिगॉर आणि टिआगो या कार सीएनजी (आय-सीएनजी) श्रेणीत बाजारात दाखल केल्या.

बहुप्रतिक्षेनंतर टाटा मोटर्सने पहिल्यांदाच टिगॉर आणि टिआगो या कार सीएनजी (आय-सीएनजी) श्रेणीत बाजारात दाखल केल्या. शिवाय या सीएनजी कारना आधुनिक तंत्रज्ञान, वैशिष्ट्यांची जोड देत बाजारात स्पर्धाही निर्माण केली आहे. या पैकी टीगॉरची राईड करण्याची संधी मिळाली. कारची आकर्षक रचना, रस्त्यावरील कामगिरी, सुरक्षितता आणि तंत्रज्ञान या चार आधारस्तंभावर या दोन्ही कार विकसित केल्याचा दावा टाटा मोटर्सतर्फे करण्यात आला असला तरी, याची प्रचिती राईड केल्यावर आली, असे नक्की म्हणू शकतो.

टाटा ''टिगॉर आय-सीएनजी''बद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी तिची किंमत जाणून घेऊ या. तर, ही कार दोन व्हेरिएंटमध्ये येत असून तिच्या ''एक्‍सझेड'' या व्हेरिएंटची दिल्ली एक्स शोरूम किंमत ७,६९,९०० तर ''एक्‍सझेड-प्लस'' या व्हेरिएंटची किंमत ८,२९,९०० इतकी ठेवण्यात आली आहे. टिगॉर आय-सीएनजीमध्ये नवीन वैशिष्ट्यांची भर घालून तिला अधिक आकर्षक बनवली आहे. त्यात मॅग्नेटिक रेड हा नवीन रंग, काळे छत, या कारचे टॉप व्हेरिएंट एक्सझेड प्लसमध्ये ड्युअल-टोन थीम दिली आहे. त्याचबरोबर रेन सेन्सिंग वायपर आणि ऑटो हेडलाइट्सही देण्यात आले आहेत. कारच्या आतील भागात ड्युअल-टोन ब्लॅक-अँड-बेज इंटिरियर थीम, सर्व दरवाजांच्या हँडलवर क्रोम आणि नवीन सीट अपहोल्स्ट्री तसेच फॅब्रिकही दिले आहेत. अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कूल्ड ग्लोव्हबॉक्ससह सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम टिगॉर पेट्रोलच्या टॉप व्हेरिएंटप्रमाणेच दिले आहेत. टिगॉरच्या डिजिटल डिस्प्लेमध्ये पेट्रोल आणि सीएनजी इंडिकेटर दिले आहे.

इंजिन शक्ती आणि राईडिंगचा अनुभव

1) टिगॉर आयसीएनजीमध्‍ये ११९९ सीसी, रेवोट्रॉन नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड १.२ लिटर बीएस-६ इंजिन दिले असून ते ७३ पीएस शक्‍ती आणि ९५ एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये केवळ पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे.

2) टिगॉरच्या पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत (८६ पीएस शक्ती, ११३ एनएम टॉर्क) सीएनजीची ताकद तुलनेने कमी असली तरी महामार्गावर या कारची राईड आरामदायी वाटली. अगदी वातानुकूलन यंत्रणा लावून घाट रस्त्यावर कारच्या कामगिरीत जराही फरक आढळला नाही, हे विशेष.

3) ओव्हरटेक करताना कारला त्वरित पिकअप मिळत नसला तरी याची काही अडचण वाटली नाही. एकूणच राईडिंग क्वालिटी, सस्पेन्शन, आरामदायी आसनव्यवस्था, पाच प्रवासी बसल्यानंतरही होणारी सुलभ हाताळणी पाहून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता येऊ शकते.

सुरक्षेची पुरेपूर खबरदारी

सुरक्षेच्या निकषांमध्ये टिगॉरला ग्लोबस एनसीएपीचे आधीच चार रेटिंग मिळाले आहेत. टिगॉर आय सीएनजीमध्ये ६० लिटर (१० किलो) क्षमतेची सीएनजी टाकी असून ज्यात स्टेनलेस स्टील ट्युब वापरण्यात आले आहे. या टाकीच्या गळतीची चाचणी घेण्यात आली असून, लिक डिटेक्शन मोड, थर्मल इन्सिडेन्ट प्रोटेक्शन आदी आधुनिक फीचर्सची जोड त्यांना देण्यात आली आहे. या कारमध्ये मायक्रो स्वीच दिले आहे, ज्याद्वारे इंधनाची छोटीशी झडप उघडी राहिल्यास कार बंद होते आणि जोपर्यंत ही झडप बंद करत नाही तोपर्यंत ती सुरू होत नाही. शिवाय ड्युअल एअरबॅग्‍ज, एबीएससह ईबीडी व कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल आदी सुरक्षात्मक फीचर्सही दिले आहेत.

‘आय सीएनजी’ तंत्रज्ञान?

टिगोर आयसीएनजी केवळ बटण दाबून सीएनजी मोडमध्येच इग्निशन चालू करून देते, जेथे अन्य कंपन्यांच्या कारसाठी पेट्रोलचा वापर करावा लागतो. कार सुरू असतानाही सीएनजी आणि पेट्रोल मोडमध्ये स्वीच करणे सोपे आहे. जेव्हा कार पुढे किंवा चढावर नेण्यासाठी अधिक शक्ती लागते तेव्हा हे स्विचिंग मोड मदत करते. शिवाय सीएनजी संपल्यास आय सीएनजी तंत्रज्ञानामुळे कार आपोआप पेट्रोल मोडवर स्वीच होते. यात कोणतेही बटण दाबण्याची गरज पडत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com