Beauty Tips : चेहऱ्याचे केस काढायचेत? प्रियांका चोप्राचा सल्ला ऐकाल तर वॅक्सिंग विसरून जाल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips by Priyanka Chopra

Beauty Tips : चेहऱ्याचे केस काढायचेत? प्रियांका चोप्राचा सल्ला ऐकाल तर वॅक्सिंग विसरून जाल!

तरूणींच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस अनेकदा त्रासदायक ठरतात. नको असलेले केस अनुवांशिक किंवा ज्या महिलांना पीसीओडीची समस्या असते त्यांच्या चेहऱ्यावर जास्त येऊ लागतात. या समस्येमुळे बऱ्याच महिला हैराण असतात आणि या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी त्या अनेक उपाय करत असतात.

चेहऱ्यावरील हे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करावी लागते. पण, हे केस घरगुती उपायाने काढता आले तर?, खरेच असे होते का?, याचे उत्तर आहे हो. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे केस काढण्यासाठी होम रेमिडीज वापरते. ते कसे पाहुयात.

प्रियांका चोप्राच्या क्लीन आणि क्लिअर चेहऱ्याचे रहस्य म्हणजे घरगुती उटणे. या उटण्याचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे छोटे केस काढू शकता. हे उटणे बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला बेसन, हळद, दही, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस लागेल.

हेही वाचा: Beauty Tips : हिना खानच्या ग्लोइंग स्कीनचं सिक्रेट आहे बाल्कनीत

जर तुमच्या चेहऱ्यावर केस कमी असतील तर तुम्ही बेसनपासून तयार केलेले उटणे लावावे. यासाठी १ चमचा बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद, काही थेंब लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि १ चमचा दही घालून चांगले मिक्स करा. हे उटणे चेहऱ्यावर, हाताला आणि पायाला लावा. एक ते दोन मिनिटांनी थोडेसे सुकल्यावर हलक्या हाताने त्यावर मसाज करा.

हेही वाचा: Beauty Tips: नारळाचे तेल नैसर्गिक मॉश्चरायझर ? वाचाल तर नक्की ट्राय कराल !

यामुळे चेहऱ्यावरील केस हळूहळू तुटू लागतील. त्यानंतर ते धबेसन, हळद, दही यापासून तयार केलेले हे हेअर रिमूव्हल उटणे आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा.