''तु मेरा बॉयफ्रेंड, मे तेरी गर्लफ्रेंड'' हे उत्तर हवे असेल तर असे करा प्रपोज''

या दिवशी मुले-मुली आपल्या आवडीच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करतात.
Propose day
Propose dayesakal
Updated on
Summary

या दिवशी मुले-मुली आपल्या आवडीच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करतात.

व्हॅलेंटाईन विक (Valentines Week) सुरू झाला आहे. रोज डेच्या (Rose Day) दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज आठ फेब्रुवारीला प्रपोज डे (Propose day) साजरा केला जातो. या दिवशी मुले-मुली आपल्या आवडीच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करतात. हा दिवस त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो, कारण या खास दिवशी ते त्यांच्या फिलिंग एकमेकांसोबत शेअर करतात.

या दिवशी काही मुलांचे प्रपोजल एक्सेप्ट केले जातात, तर काही मुलांचे रिजेक्ट केले जातात. कोणाचा प्रपोजल रिजेक्ट केला जातो, त्याचे कारणही चुकीच्या पद्धतीने प्रपोजल करणे असू शकते. जर तुम्हीही प्रपोज डेच्या दिवशी एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मुलींनी दिलेल्या प्रपोजचे काही ट्रिक्स वापरून पाहू शकता, ज्यामुळे रिजेक्ट होण्याची शक्यता खूपच कमी असते.

Propose day
Love Matters : 'व्हँलेटाईन डे'ला खास व्यक्तीला प्रपोज करताय? आयुष्याचा निर्णय घेण्याआधी एकदा हे वाचा

रोमांटिक प्रपोज (Romantic propose):

प्रत्येक मुलीला तिच्या पार्टनरने तिला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करावे असे वाटते. जर तुम्हालाही समोरच्या व्यक्तीबद्दल फिलिंग असतील आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले तर ते रिजेक्ट करु नये, पण त्याचा विचार केला पाहिजे. तुम्हालाही एखाद्याला प्रपोज करायचे असेल तर तो थोडा रोमँटिक असावा. यासाठी तुम्ही गुलाबांचा पुष्पगुच्छ सोबत घेऊन प्रपोज करू शकता. I Love You म्हणण्याऐवजी तुम्ही काही रोमँटिक शायरी किंवा कविता वापरू शकता. याशिवाय कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही तिला रोमँटिक वातावरणात प्रपोज करू शकता.

डेस्टिनेशन प्रपोज (Destination propose):

कोविडमुळे काहीजण बाहेर जायला घाबरत आहेत, यासाठी त्यांना भेटण्याऐवजी कॉलवर प्रपोज करण्याचा विचार केला असाल. परंतु तुम्हाला कोविड प्रोटोकॉलचे पालन करून प्रपोज करणे उत्तम राहील. यासाठी तुम्ही मुलीला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता आणि नंतर तिला तुमच्या मनातील फिलिंग सांगू शकता.

Propose day
Propose Day 2022: अमिताभ - जया बच्चन यांच्या प्रपोजचा किस्सा माहितीये?

लव-लेटर लिहा (Write a love letter):

लव-लेटर ही पद्धत काही लोकांना खूप जुनी वाटू शकते, परंतु ही एक रोमँटिक पद्धत असू शकते. जर तुम्हाला कोणाला प्रपोज करायचे असेल तर तुमच्या सर्व फिलिंग पत्रात लिहा आणि तुमच्या हाताने त्या मुलीला द्या.

आठवणींचा आधार घ्या (Take advantage of memories):

जर तुम्ही काही हटके पद्धतीने प्रपोज करत असाल तर ते रिजेक्ट होण्याची शक्यता खूपच कमी असते. मुलीला प्रपोज करण्‍यासाठी, मुलीसोबतच्‍या तुमच्‍या सर्व आठवणी एकाच ठिकाणी ठेवा, फोटो आणि काही मजेदार गप्पा प्रिंट आउट करा आणि एका बॉक्समध्ये एकत्र जमा करा. ही आयडिया खूप चांगली काम करेल आणि तुमचा प्रपोजल रिजेक्ट केला जाणार नाही.

Propose day
सिंगल आहात! असा साजरा करु शकता व्हॅलेंटाईन डे

रात्री जेवण करायला घेऊन जा (Take on a dinner):

मुलीला तिच्या आवडत्या ठिकाणी लंच किंवा डिनरसाठी घेऊन जा. तिथे जा आणि तिची आवडती डिश ऑर्डर करा, ज्यामुळे तिला वाटेल की तुम्हाला तिच्या आवडीनिवडीची चांगली कल्पना आहे. यानंतर, त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवा.

ऑनलाइन प्रपोज (Online propose):

जर तुम्ही कोविडमुळे घर सोडू शकत नसाल किंवा तुमच्या पार्टनरला भेटू शकत नसाल, तर आता ऑनलाइन प्रपोज करण्याचे अनेक ट्रिक्स आहेत. ऑनलाइन प्रपोज करण्यासाठी, तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी ऑनलाइन ग्रीटिंग तयार करू शकता. किंवा तुम्ही एक व्हिडिओ तयार करू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमचा आवाज ऑडिओच्या स्वरूपात ठेवू शकता. याशिवाय, तुम्ही क्लाउडवर जागा घेऊन एक ऑनलाइन वेबसाइट तयार करू शकता, ज्यामध्ये तुम्ही तिच्यासोबत घालवलेली प्रत्येक मेमरी सेव्ह राहील.

परंतु यावेळी हे लक्षात ठेवा की फक्त अशाच मुलींना प्रपोज करताना या पद्धती फॉलो करा, ज्यांना तुम्ही आधीपासून चांगले ओळखता आणि ती ही तुम्हाला ओळखते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com