Propose Day 2022: अमिताभ - जया बच्चन यांच्या प्रपोजचा किस्सा माहितीये?

Valentine Week 2022 Propose Day
Valentine Week 2022 Propose Day

Happy Propose Day: व्हॅलेंटाईन विकची (valentine week) सुरूवात झाली आहे.प्रेमी-प्रेमिका आपल्या प्रेमाची कबुली कशी द्यावी? याचा विचार करत आहेत. तुम्हालाही जर कोणाला प्रपोज करायचे असेल पण तुम्हाला व्हॉट्स अॅपवर प्रेमाची कबुली द्यायची नसेल तुमच्यासाठी पर्याय आहे. तुम्ही सुपरस्टार अमिताभ बच्चनसारखे (Amitabh Bachchan) जया बच्चन (Jaya Bachchan) प्रेमाची कबुली देऊन तुमच्या जोडीदाराला (Partner) प्रपोज करू शकता. प्रपोज डे असो किंवा नसो, प्रेम व्यक्त करणे हे सोपे काम नाही पण, जेव्हा तुम्हाला उत्तर होकार मिळतो तेव्हा सर्व मेहनत फळाला येते. तुम्हाला जर प्रप्रोज (propose) करायचे असेल तर तुम्ही अमिताभ आणि जया यांची प्रेम कथेतून प्रेरना घेऊ शकता. (How Amitabh Bachchan proposed to Jaya Bachchan for Marriage)

Valentine Week 2022 Propose Day
रोझ डे! प्रेमवीरांना फुलाचे महत्व का असते

Propose Day 2022 : अमिताभ आणि जया यांच्या लग्नाला ४८ वर्ष झाले आहे. बॉलीवूडची या जोडीचे लग्न अजूनही तितकेच दृढ आहे जितके आधी होते. अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की जया यांना त्यांनी सर्वात आधी एका मॅग्जीनमध्ये पाहिले होते. जया यांचे डोळे अमिताभ यांना खूप आवडले होते. अमिताभ जेव्हा पहिल्यांदा गुड्डी चित्रपटाच्या सेटवर जया यांना भेटले तेव्हा त्यांना जया सोबत लग्न करायचे आहेय पण अमिताभ यांनी कधीही गुडघ्यावर बसून किंवा फूल देऊन प्रेमाची कबुली दिली नाही. जया यांनी सांगितले होते की, अमिताभ खूप लाजत होते आणि दोघ एकमेकांशी खूप बोलत होत नव्हते.

सिमि ग्रेवालच्या (Simi Grewal) शोमध्ये, जया आणि अमिताभ यांनी आपली प्रेम कहानी(Amitabh Jaya Love Story) सांगितली होती, त्यावेळी त्यांनी असा उल्लेख केला होता की, अमिताभ त्या लोकांपैकी नव्हते जे त्याच क्षणी जयाचे कौतूक करायचे आणि ते एक किंवा दिड महिन्यांनी सांगायचे की, जया तू त्या दिवशी जी साडी नेसली होती तीच नेस, त्यात तू खूप सुंदर दिसत होती.

Valentine Week 2022 Propose Day
चेक बाऊन्स झाल्यास काय होते? समजून घ्या तुमचे कायदेशीर अधिकार

अमिताभ आणि जया जंजीर चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते, त्यानंतर १९७३मध्ये विवाहबंधनात अडकले. जंजीर चित्रपटाला यशस्वी झाल्यानंतर अमिताभ आणि जया यांना मित्र-मैत्रीणींसोबत लंडनला जायचे होते. पण ही कल्पना अमिताभ यांची वडील हरिवंशराय बच्चन यांना पटली नाही. त्यांनी अमिताभ यांना विचारले, ''कोणासोबत जात आहेस?'' जया यांच्यासोबत जाण्यावर नाराजी व्यक्त करत त्यांचे अमिताभ यांच्या वडिलांनी सांगितले होते की, जायच असेल तर लग्नानंतर जा'' त्यावर अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले होते की, ठिक आहे, आम्ही उद्याच लग्न करतो. त्यानंतर अमिताभ यांनी जया यांना लग्नाची मागणी घातली. जया यांनाही अमिताभ खूप आवडत होते आणि त्यांच्यासाठी नकार देणे अवघड होते. जया या आधीपासून या लग्नासाठी तयार होत्या आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले.

Valentine Week 2022 Propose Day
Rose Day : प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला कोणत्या रंगाचा गुलाब द्याल? जाणून घ्या

या गोष्टी लक्षात ठेवा

व्हॅलेटाईन दिवशी भावूक होऊन सार्वजनिक ठिकाणी प्रपोड करण्याआधी व्यवस्थित विचार करा. कित्येक वेळा समोरच्यासाठी खूप ऑक्वर्ड होऊ शकते.

प्रपोज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फिजिकल जवळ येणे टाळा, तुम्ही दोघेही एकसारखा विचार करत असाल हे गरजेचे नाही.

पुस्तकी गोष्टी सांगण्याऐवजी आपल्या मनातील भावना व्यक्त करा.

स्वत:ला नकारासाठी तयार करा. खूप जास्त अपेक्षा वाढवू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com