
आजच्याच दिवशीच राणी व्हिक्टोरियाने प्रिन्स अल्बर्टला लग्नासाठी घातली होती मागणी
प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. पण ते व्यक्त करायच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतातं. खरं तर आयुष्यात खास माणसांसोबत अतुट नाते जोडण्यासाठी खास अन् एखाद्या दिवसाची, क्षणाची किंवा कोणत्याही मुहूर्ताची खरं तर आवश्यकता नसते. आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात त्या म्हणजे ‘प्रयत्न’आणि ‘वेळ’. या दोन्ही गोष्टींमुळे कोणतीही व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. अशा व्यक्तीसमोर मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज नाहीयेय. काही मंडळी मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine's Day) यासारख्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.
‘व्हॅलेंटाईन डे’ पूर्वी ‘व्हॅलेंटाईन वीक’देखील जल्लोषात साजरा केला जातो. या वीकची सुरुवात 07 फेब्रुवारीला ‘रोझ डे’ (Rose Day) ने केली जाते. तुमचे हदय योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य दिवशी अन सगळ्यात महत्त्वाचं योग्य व्यक्तीजवळ देण्याचा हा दिवस असतो. आज 08 फेब्रुवारीला म्हणजे प्रपोज डे सेलिब्रेट केला जातो. या दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करुन एकमेकांना प्रेमाचे वचन देतात.
प्रपोज डेचा इतिहास
नॅशनल प्रपोज डे (Propose day) ची स्थापना जॉन माइकल ने केली होती. जॉन माइकल (John Michael) याने आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहिली आणि शेवटी त्याच्या प्रेयसीला तिच्या आयुष्यात पुढे सोडून जावे लागले. कारण त्यावेळी जॉन तिला प्रपोज करुच शकला नाही, कारण त्यावेळी त्याच धाडसच झाले नाही. यामुळे मग त्याने हा प्रपोज डे डिजाईन केला. "की मी माझी प्रेयसी गमावली पण इतरांनी या दिवशी आपल्या प्रेयसीला प्रेमाची कबुली देऊन प्रपोज करावे आणि प्रेमाचा प्रवास सुरु करावा. असा एक अंदाज आहे की प्रपोज डेच्या दिवशी जगभरात पन्नास हजार जोडपे या महत्त्वाच्या दिवशी एकमेकांमध्ये गुंततात. जे लोक असंख्य दिवसापासून प्रपोज करण्यासाठी योग्य वेळ शोधत आहे आणि तुम्ही जर पार्टनरसोबत आयुष्यभराकरीता एकत्र येण्याच्या विचार करत असाल तर ही योग्य वेळ असू शकते. आज तुमच्या मनातल्या फिलींग बोलून प्रपोज करण्यासाठी हा खास दिवस आहे.
तुमच्या प्रियकर प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी तुम्ही छोटे छोटे प्रयत्न करुनही त्यांचे मन जिंकु शकता. खऱ्या प्रेमाची कबुली द्यायला अवाजवी गोष्टीची गरज नसते. तुमच्या मनातील फिलींग तुमच्या पार्टनरपर्यंत पोहोचवा "माझं तुझ्यावर प्रेम आहे" हे शब्दही बहुमोल ठरु शकतात. प्रपोज डेच्या दिवशीच 1839 मध्ये राणी व्हिक्टोरियाने (Queen Victoria) प्रिन्स अल्बर्टला (Prince Albert) लग्नासाठी हात देण्याची विनंती केली होती.
प्रपोज डे कसा साजरा करावा.?
सुरेख असं छोटसं पत्र लिहून, तुमच्या भावना समाविष्ट असलेली एखादी चाळोळी लिहुन तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला छान वचन देऊन प्रपोज डे साजरा करु शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.