साधेपणातील सौंदर्य

साधेपणा कधी कधी इतका प्रभावी ठरतो की, त्यासमोर महागडा ट्रेंडही फिका पडतो. सहजच केलेला मिक्स अँड मँच असो दे की कॉन्ट्रास्ट स्टाइल नकळतच लक्ष वेधतात.
Beautiful
Beautifulsakal

- पृथा वीर

साधेपणा कधी कधी इतका प्रभावी ठरतो की, त्यासमोर महागडा ट्रेंडही फिका पडतो. सहजच केलेला मिक्स अँड मँच असो दे की कॉन्ट्रास्ट स्टाइल नकळतच लक्ष वेधतात. भलेही त्या ड्रेसिंगचा कोणताही ट्रेंड नसला तरीही तोच ट्रेंड म्हणून पुढे येते. तशीही फॅशन पुन्हा पुन्हा अपसायकल होऊन येते. म्हणूनच ती हवीहवीशी वाटते.

गुजरात शैलीचे गढवाल पॅटर्न आणि कर्नाटकी शैलीच्या धारवाड पॅटर्नचे ड्रेस मटेरिअल या साधेपणाला साजेशी चॉईस. जाड धाग्यांचे हाताने ओवलेले गढवाल पॅटर्न हा खूप नाजूक व दुर्मीळ प्रकार. यामध्ये लॉँग टॉपसुद्धा कोणत्याही कार्यक्रमासाठी अचूक निवड ठरतो. धारवाडी लाँग टॉप, पांढरी जेग्नींस, पांढरा चंदेरी दुपट्टा ट्रेंडमध्ये आहे.

सुंदर हॅण्‍ड एम्ब्रॉयडरी व पोतलींचा वापर असलेला ज्युट कुर्ता लक्ष वेधतो. लॉँग स्वेअर नेक, गोल गळा व ऑल सीझन हीट हॉल्टर कटमध्येही पॅटर्न खूप चालतात. प्लेन स्लीव्हज, चंदेरी पॅच, कॉलर नेक आणि संपूर्ण स्ट्रेट कट असलेला चंदेरी कुर्तासुद्धा असाच साधा प्रकार. यामध्ये सर्वाधिक भाव खातात, ते साऊथ कॉटन कुर्ते. साऊथ कॉटनचे नक्कीच वेगळे स्‍थान आहे.

आपले खास वैशिष्ट्य जोपासणाऱ्या कापडांना कायमच मागणी असते. हातमागाचा मंगलगिरी प्रकार यातलीच एक. कॉटन असूनही हा तलम कापड वजनाला हलका असतो. मंगलगिरी कुर्ते यांचा खास चाहता वर्ग आहे. याशिवाय मटका गळा, पॅचवर्क फॅशनची चलती आहे. मंगलगिरी कॉटनमध्ये मटका गळा, जरी बॉर्डर, गोठ, डोरी असलेले फ्रॉक स्टाईल कुर्ते उठून दिसतात.

अ‍ॅक्सेसरीज हा रोजच्या फॅशनमधला महत्त्वाचा भाग. सध्या तर अ‍ॅक्सेसरीजच्या बाबतीतही चोखंदळ असलेल्या महिलांचा कल हा युज अ‍ॅण्ड थ्रो, स्मार्ट पण जास्त महाग नसलेल्या, एकाच गोष्टीचे अनेक पर्याय देणाऱ्या आणि त्यातही नवं काही हटके देणाऱ्या अ‍ॅक्सेसरीजकडे आहे. पारंपरिक दागिन्यांसोबत क्लासिक कॉन्ट्रास्टचा ट्रेंड बघायला मिळतो.

पूर्वी अगदी साडीपासून ते टिकलीपासून सगळं मँचिंग असावा, असा आग्रह असायचा. अलीकडे मात्र कॉंट्रास्ट ज्वेलरीचा ट्रेंड सुरू आहे. हिरव्या ड्रेसवर लाल, पिवळ्या डिझायनर पीससोबत निळी, काळ्या सुटवर लाल ज्वेलरी अशी फॅशन असल्याचं ‘ट्रेंड एक्सपर्ट’ म्हणतात.

कॉटन साडीचा ट्रेंड

कॉटन साडी सिंपल असली, तरीही ठसठशीत दागिने खूप उठून दिसतात. म्हणून कॉटन साडी तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. कामाच्या ठिकाणी परफेक्ट वाटणारी आणि सिंपल पण आत्मविश्वास देणारी कॉटन साडी कोणत्याही कार्यक्रमाला साजेशी ठरते. मॅचिंग साडीवर मॅचिंग ब्लाउज आणि मॅचिंग दागिने घालण्यापेक्षा विरुद्ध रंगसंगतीचा वापर करण्याचा ट्रेंड सध्या लोकप्रिय आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com