Ragi Cheela
Ragi Cheelaesakal

Ragi Cheela : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा चिला, चवदारही लागणार अन् पोट ही भरणार, वाचा सोपी रेसिपी

Ragi Cheela : सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर त्यासाठी नाचणीचा चिला हा बेस्ट ऑप्शन आहे.

Ragi Cheela : सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर त्यासाठी नाचणीचा चिला हा बेस्ट ऑप्शन आहे. नाचणीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आढळून येते. शिवाय, ग्लूटेन फ्री असलेली नाचणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नाचणीचा चिला नक्कीच बनवू शकता.

खायला चवदार लागणारा हा पदार्थ सकाळच्या गडबडीत बनवायला अतिशय सोपा आहे. हा चिला बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज भासत नाही. चला तर मग जाणून घेऊयात नाचणीचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.

Ragi Cheela
Potato Bread Balls Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी अन् हेल्दी बटाटा ब्रेड बॉल्स, एकदम सोपी आहे रेसिपी

नाचणीचा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप नाचणीचे पीठ

  • ३ चमचे बेसन

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ टोमॅटो बारीक चिरलेला

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • अर्धा कप दही

  • १ चमचा लाल तिखट

  • अर्धा चमचा हळद

  • चवीनुसार मीठ

  • तेल

नाचणीचा चिला बनवण्याची सोपी पद्धत

  • एका बाऊलमध्ये नाचणीचे पीठ, बेसन आणि दही मिक्स करा.

  • हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.

  • आता या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मिसळा.

  • त्यानंतर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि थोड तेल मिसळा.

  • आता य मिश्रणात थोड पाणी घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • आता गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा. त्यावर तेल पसरून नाचणीच्या मिश्रणाचे पीठ घाला.

  • त्यावरून तेल पसरवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.

  • त्यानंतर, गरमागरम नाचणीचा चिला खायला घ्या.

  • पुदिना चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

Ragi Cheela
Oats Upma Recipe : नाश्त्याला बनवा हेल्दी अन् टेस्टी ओट्स उपमा, चवीला लागतो भन्नाट, वाचा सोपी रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com