
Yoga Exercises For Rainy Days: पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेकांची दिनचर्या थोडी बदलते. काही लोकांना पावसाच्या सरींमध्ये मॉर्निंग वॉकला जाणे खूप आवडते. परंतु, मूसलधार पाऊस किंवा गारठा यामुळे पावसाळ्यात वॉकला जाणे थोडं कठीण होऊ शकतं. अशा वेळी बाहेर न जाता घरच्या घरी काही सोपी योगासने केली तरी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.