Raksha Bandhan 2023 : भावा-बहिणीच्या नात्यावरची साडेसाती ठरतंय हक्कसोड पत्र? वाचा काय आहे?

हक्कसोड पत्र कोण लिहून देऊ शकतं?
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023esakal

Raksha Bandhan 2023 : परवाच एक मैत्रिण सांगत होती, अगं त्या मामींच्या भावाने म्हणे त्यांच्याकडून फसवून सह्या करून घेतल्या, आणि जेव्हा संपत्तीच्या वाटणीची वेळ आली तेव्हा मामींना एकही रूपया दिला नाही. आणि जेव्हा मामी आई-बाबाची आठवण रहावी म्हणून शेताचा एक तुकडा मागायला गेल्या तेव्हा त्यांना समजलं की, त्यांनी स्वत:च हक्कसोड दिली आहे.

तेव्हा मामी बुचकळ्यात पडल्या की, हे कसं झालं. भावाने सह्या नेल्या पण खोट बोलून. पण अशिक्षित असलेल्या मामींना हे कळलच नाही. 

ही एक केस तर, दुसरी अशीच ऐकण्यात आलेली गोष्ट. जेव्हा एखाद्या घरातील मुलगी अंतरजातीय विवाह करते. तेव्हा तिच्याकडे होणाऱ्या हक्कसोड पत्राची मागणी वाढते. जरी तिच्या आई-वडिल, भावाला हे मागायचं नसलं तरी पाहुणे मंडळींच्या दबावाखातर हक्कसोड पत्राची मागणी भावाकडून बहिणीला केली जाते.

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : राखी पौर्णिमेवर संक्रांत आणणारा भद्राकाळ आहे तरी काय? लोक त्याला एवढे का घाबरतात?

हक्कसोड पत्र, आयुष्यात कधी ना कधी या शब्दाशी तुमची गाठ पडली असेल. समाजात या हक्कसोड पत्राचा सध्या बोलबाला आहे. अनेक बहिण-भावाच्या नात्यात साडेसाती ठरत असलेले हक्कसोड पत्र नक्की काय आहे, आणि त्यावर सही केल्याने काय होते हे जाणून घेऊयात.

हक्कसोड पत्र म्हणजे काय ?

सोप्या भाषेत सांगायचं तर, हक्कसोड पत्र म्हणजे बहिणीने बाबाच्या संपत्तीवर सोडलेले पाणी होय. कायद्यानुसार वडिलोपार्जित संपत्तीवर मुलगा, मुलगी या दोघांचाही समान हक्क आहे. त्यामुळे जेव्हा माहेरी असलेल्या संपत्तीच्या वाटण्या होत असतात. तेव्हा बहिणीला तिचा हक्क दिला जातो.

कायद्याच्या भाषेच याला, कोणत्याही सदस्याने आपल्या वाट्याला येणारी संपत्ती कुटुंबातीलच सदस्याच्या नावे स्वइच्छेने लिहून देणं होयं. (Raksha Bandhan 2023)

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनादिवशी होणार दुर्लभ योग; या चूका करणं महागात पडेल!

हक्कसोड पत्र कोण लिहून देऊ शकतं?

 एखाद्या कुटुंबातील संपत्तीचा विचार केला तर हक्कसोड पत्र हा प्रत्येक व्यक्ती देऊ शकतो. संबंधित कुटुंबात असलेली बहिण, भाऊ, काका, पुतणे ज्या लोकांच्या नावे ती संपत्ती आली असेल तो प्रत्येक व्यक्ती हक्कसोड पत्र देऊ शकतो.

वारसा हक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतील स्वत:च्या हिस्स्याला आलेली संपत्ती तो इतर सदस्याच्या नावे करू शकतो.

Raksha Bandhan 2023
Mumbai Raksha Bandhan : रक्षाबंधनाला जादा ‘लालपरी’ची जोड ; बहिणाबाईला यंदा ‘सवलतीची राखी’

हक्कसोड पत्र कोणाच्या नावे करता येतं

काही वेळा बहिणी स्वत:हूनच हक्कसोड पत्र देतात. त्यावेळी ते कोणाच्या नावावर करता येते याबद्दल बोलायचे झाले तर, त्या संबंधित कुटुंबाचे सदस्य, सहसदस्य असलेल्या व्यक्तीच्याच नावे हक्कसोड पत्र करता येते.  (Property)

Raksha Bandhan 2023
Mumbai Raksha Bandhan : रक्षाबंधनाला जादा ‘लालपरी’ची जोड ; बहिणाबाईला यंदा ‘सवलतीची राखी’

कोणत्याही संपत्तीत हक्कसोड पत्र करता येत का?

अनेकांना वाटतं की, प्रत्येक संपत्तीचे हक्कसोड पत्र होऊ शकते. पण, तसं नाहीय, हक्कसोड पत्र हे केवळ वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीचेच होऊ शकते. म्हणजे, वडिलांची संपत्तीच्या मागे जितके भावंड असतात तितक्या सगळ्यांची नावे त्याला लागतात. त्यापैकी मिळालेल्या संपत्तीवर हक्कसोडपत्र देता येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com