Ram Mandir : 2024 मध्ये मंदिर उभारण्याचा श्रीरामांच्या सासुरवाडीने 57 वर्षाआधीच काढला होता मुहूर्त, पोस्टल तिकीट होतंय व्हायरल

श्री रामांची सासरवाडी असलेल्या नेपाळमधील पोस्टाच तिकीट व्हायरल होत आहे
Ram Mandir
Ram Mandiresakal

Ram Mandir : 

अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेल्या राम मंदिरात श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा लवकरच केली जाणार आहे. देशातील प्रत्येक गावात अक्षता वाटून या शुभकार्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. यासाठी भारत सरकारने 22 जानेवारीचा शुभ मुहूर्त यासाठी काढला आहे. पण अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त १९६७ मध्येच काढण्यात आला होता. त्याबद्दलचे एक पोस्टल तिकीट व्हायरल होत आहे.

प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे.  राम मंदिर 36 ते 40 महिन्यांत बांधून पूर्ण झाले आहे. मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा अजिबात वापर केला गेली नाही. मंदिराचे वय किमान एक हजार वर्षे असेल. लार्सन आणि टुब्रो कंपनी, आयआयटीच्या अभियंत्यांची तांत्रिक मदत देखील बांधकामासाठी घेण्यात आले आहे. मंदिराच्या ठिकाणी आढळलेल्या अवशेषांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Ram Mandir
MS Dhoni Ram Mandir : धोनी देखील अयोध्येला जाणार...? राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं पोहचलं आमंत्रण

अयोध्येच्या महाराणी सीता यांचे माहेर अन् प्रभू श्री रामांची सासरवाडी असलेल्या नेपाळमधील पोस्टाच तिकीट व्हायरल होत आहे. हे तिकीट 1967 मधील असून त्यावर रामनवमी 2024 असे लिहीण्यात आले आहे. याचा अर्थ 2024 मधील रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाईल, असे सांगण्यात आले आहेत.

Ram Mandir
Ram Mandir : २२ जानेवारीला राम येणार नाहीत, स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं; बिहारच्या मंत्र्याचं विधान
हेच आहे ते पोस्टाचे तिकीट ज्यावर रामनवमी 2024 असा उल्लेख आहे
हेच आहे ते पोस्टाचे तिकीट ज्यावर रामनवमी 2024 असा उल्लेख आहे esakal

57 वर्षे जुने टपाल तिकीट आणि त्यावरील तारीख हा एक विलक्षण योगायोग मानला जात आहे. 1967 मध्ये असलेले केलेले हे टपाल तिकीट भगवान राम आणि सीतेला समर्पित करण्यात आले होते. ज्यामध्ये राम मंदिराच्या अभिषेकाचे वर्ष लिहिले आहे.

कसं आहे हे तिकीट

नेपाळमध्ये असलेल्या या तिकीटावर भगवान श्री राम धनुष्यबाणांसह आहेत.  त्यांच्यासोबत माता सीताही आहेत. या 15 पैशांच्या टपाल तिकिटावर ‘राम नवमी 2024’ असे लिहिले आहे. हे टपाल तिकीट 18 एप्रिल 1967 रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर पब्लिश करण्यात आले होते.

Ram Mandir
MS Dhoni Ram Mandir : धोनी देखील अयोध्येला जाणार...? राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं पोहचलं आमंत्रण

विक्रम सवंतमधील तिकीट

नेपाळी पोस्टल स्टॅम्पवर लिहिलेले राम नवमी 2024 हे इंग्रजी कॅलेंडरमध्ये नाही तर विक्रम संवतमध्ये लिहिलेले आहे. विक्रम संवत हे इंग्रजी कॅलेंडरपेक्षा 57 वर्षे पुढे चालते. त्यामुळे 1967 मध्ये जारी झालेल्या या पोस्टल स्टॅम्पवर 2024 हे वर्ष आणि पुढे 57 वर्षे असे लिहिले आहे.

म्हणूनच हे आश्चर्यकारक आहे की इतक्या वर्षांपूर्वी जारी केलेल्या या तिकिटावर अभिषेकची तारीख आधीच लिहिली गेली होती असे म्हणता येईल. हा केवळ योगायोग आहे,अशीही काही भक्तांची मान्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com