Ram Navami 2024: रामनामाचा होतो गजर

Ram Navami 2024: त्यावेळी शहरातील दक्षिणेकडील तुटक वसाहत पाच-पन्नास राजपूत कुटुंबांची ही वसाहत. मंदिराचे संरक्षण व्हावे, यासाठी वाडावजा मंदिरात ठेवण्यात आले आहे.
Ram Navami 2024:
Ram Navami 2024:Sakal

मधुकर कांबळे

छत्रपती संभाजीनगरवर पूर्वी निजामाचे राज्य होते. त्यावेळी देव-देवतांच्या मंदिरांचे संरक्षण व्हावे, यासाठी वाडावजा मंदिरे असायची. त्यापैकीच एक आहे टिळकपथनजीकच्या बढाई गल्लीतील पुरातन राममंदिर. त्यावेळी शहरातील दक्षिणेकडील तुटक वसाहत पाच-पन्नास राजपूत कुटुंबांची ही वसाहत. मंदिराचे संरक्षण व्हावे, यासाठी वाडावजा मंदिरात ठेवण्यात आले आहे. प्रथमदर्शनी वाड्यासारख्या दिसणाऱ्या या प्रभुरामाच्या मंदिरात गेल्यानंतर उजवीकडे अगदी लहान जागेत राममंदिर दृष्टीस पडते.

आकाराने लहान असलेल्या सभामंडपातून मंदिराचा गाभारा पाहताच श्रीराम व अनेक देवता अशा तब्बल २२ देवतांच्या पुरातन, रेखीव व सुंदर मूर्ती आपले मन मोहून टाकतात. भव्य देवघरात राम-लक्ष्मण, विठ्ठल-रुख्माई, श्रीकृष्ण व देवी पार्वती यांच्या मोठ्या आकाराच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

देवघराच्या समोरच्या भागातही विद्येची देवता गणेश, हनुमान, संत गजानन महाराज, भगवान बालाजी, रंगनाथ, लड्डू-गोपाल, गुरुदेव दत्त, लक्ष्मी-व्यंकटेश आदी देव-देवतांचा समावेश आहे. या सर्व मूर्ती पुरातन आहेत. देवघराच्या उजव्या बाजूला हनुमानाचे एक छोटेसे मंदिर असून, त्यात शेंदुरधारी मारुतीची मूर्ती दिसते. या मारुतीचे मुख दक्षिणेकडे असून अत्यंत सध्या स्वरूपात असलेली ही मूर्ती देखील लक्ष वेधून घेते.

Ram Navami 2024:
Ram Navami 2024 : आज रामनवमी.! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व अन् पूजेची पद्धत

या श्री बालाजी राममंदिर ट्रस्टचे ९० वर्षीय अध्यक्ष अंबादास ठाकूर म्हणाले, ‘‘२०० वर्षे पुरातन मंदिर आहे. माझे वडील जेव्हा १५ वर्षांचे होते, त्यावेळी १९२५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे आम्ही त्यांच्याकडून ऐकले आहे. या ठिकाणी मॉँ शेरावालीचेही मंदिर होते, ते पूर्वमुखी असल्याने प्रभुरामाचे मंदिर पश्चिममुखी करण्यात आल्याचे सांगितले जाते.

या मंदिरातील मूर्ती या १५ व्या व १६ व्या शतकातील आहेत, तसे पुरातत्त्व विभागाकडून प्रमाणित करण्यात आले. त्याचे आमच्याकडे प्रमाणपत्रही असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले. एवढ्या पुरातन असलेल्या मंदिरात आणि शहरातील मध्यवस्तीमध्ये बढाई गल्लीतील राममंदिरात जाऊन प्रभुरामासह अनेक आराध्य दैवतांचे दर्शन नक्की घ्यावे, एवढे हे पुरातन राममंदिर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com