नातीगोती : अहंकार बाजूला ठेवा!

कुटुंबव्यवस्थेबद्द्ल मला दोन महत्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे समजूतदारपणा आणि माफ करण्याची क्षमता असणे खूप गरजेचे आहे.
Relations
RelationsSakal

- रणधीर शर्मा

कुटुंबव्यवस्थेबद्द्ल मला दोन महत्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे समजूतदारपणा आणि माफ करण्याची क्षमता असणे खूप गरजेचे आहे. कुटुंबात प्रेम आणि विश्वास तर असतोच; पण या दोन गोष्टी असतील तर आपली कुटुंबव्यवस्था खूप व्यवस्थित राहते.

माझ्या कुटुंबात आई आणि बाबा दोघांवरही माझे खूप प्रेम आहे. आई सर्वांत जास्त जवळची आहे; कारण मला असे वाटते की, आपण जेवढा बाबांसोबत वेळ घालवत नाही, तेवढा वेळ बालपणापासून मोठे होईपर्यंत आपण आईच्या सानिध्यात घालवतो.

माझ्या आईचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ती खूप धाडसी आहे. कितीही मोठे संकट येऊ दे, ती केव्हाच घाबरत नाही आणि हा गुण मी तिच्याकडून शिकायचा प्रयत्न करतो आहे. मला एक खूप छान प्रसंग आठवतो, की लहानपणी आमच्या जयपूर शहरात भाड्यावर सायकली चालवायला मिळायच्या, तेव्हा ती मला रोज संध्याकाळी तिकडे घेऊन जायची. तेव्हा मी शिकत होतो.

पडायचो, धडपडायचो; पण ती मला मदत करायची, मला सपोर्ट मिळावा म्हणून पाठीमागून सायकल पकडून धावायची. या आठवणी जेव्हा आठवतात, तेव्हा मी भावुक होतो.

माझ्या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे, आम्ही नीतिमूल्ये जपतो. प्रामाणिक असणे, जीवन साधेपणाने जगणे, कृतज्ञता असावी आणि मेहनत करून प्रगती करावी या सगळ्या गोष्टींवर आम्ही सगळे विश्वास ठेवतो.

माझ्या कुटुंबात सगळे कलाप्रेमी आहेत. माझी आई पण संगीत शिकवते. सध्या मी अँड टीव्हीवरिल ‘दुसरी माँ’ या मालिकेत दर्शन दवे यांची भूमिका साकारत आहेत. चित्रीकरणात व्यग्र असलो, तरी जेव्हा वेळ मिळतो, त्यावेळी आम्ही एकत्र जमतो. कला क्षेत्र, जुन्या व नवीन कलाकारांबद्दल, नवीन व जुन्या गाण्याबद्दल आमच्यात गप्पागोष्टी सुरू असतात. त्यामुळे सर्वजण आनंदी होतात.

सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही वाईट प्रसंग येत असतात. आमच्या आयुष्यात पण एकदा खूप वाईट प्रसंग ओढवलेला. तेव्हा आर्थिक स्थितीपण ढासळून गेलेली आणि बाबांची तब्येतही खालावलेली, तेव्हा मी मुंबईहून परतलो आणि त्यांची काळजी घेतली.

एवढे काम केले आयुष्यात; पण एका गोष्टीची जाणीव झाली, की आपण आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचे असतो. त्यांची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मला असे वाटते, की नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवावा आणि सगळ्या लोकांशी नम्रपणे वागावे.

नाती दृढ होण्यासाठी…

१) कुटुंबाची काळजी घ्यावी व त्यांना वेळ द्यावा.

२) मीपणा असू नये, दुसऱ्याचे मत ऐकायची क्षमता असावी.

३) नात्यात विश्वास व प्रेम असावे..

४) सद्यपरिस्थितीशी जुळवून घ्यावे.

५) प्राप्त परिस्थिती स्वीकारा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com