Republic Day 2023: छान अन् आकर्षक रांगोळ्या; गणराज्य दिनी वाढवेल अंगणाची शोभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

republic day rangoli idea

Republic Day 2023: छान अन् आकर्षक रांगोळ्या; गणराज्य दिनी वाढवेल अंगणाची शोभा

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत, ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये, घराबाहेर लोकं रांगोळ्या काढत असतात, पण त्याच त्याच संस्कार भारतीच्या रांगोळ्या आता जुन्या झाल्यात.. पण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन विशेष पोस्टर रांगोळी काढू शकत नाही.

हेही वाचा: Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाचा आउटफिट शोधताय? इथे आहेत २०० रुपयांच्या आतले ड्रेसेस

मग नक्की कोणत्या रांगोळ्या काढाव्यात असा प्रश्न आहे? या आहेत खूप सोप्या रांगोळ्या

हेही वाचा: Republic Day 2023 : चवही अन् सेलिब्रेशनही! बोटं चाटत राहाल असा रिपब्लिक डे स्पेशल नाश्ता

republic day rangoli idea

republic day rangoli idea

ही रांगोळी अगदी छोट्याशा जागी सुद्धा काढता येईल अशी आहे, एका चौकोनात आपल्या तिरंग्याचे रंग काढून आजूबाजूला तुम्ही फुलांची डिझाईन करू शकतात.

हेही वाचा: Republic Day Special Recipe : खास प्रजासत्ताकदिनी नाश्त्याला बनवा तिरंगा पोहे

republic day rangoli idea

republic day rangoli idea

आपल्याकडे ध्वजारोहण झालं की पक्षी आकाशात उडवण्याची प्रथा आहे, तुम्ही याचं प्रतीक असलेली ही रांगोळी काढू शकतात आणि आजूबाजूने मोऱ्याच्या पिसांची सुद्धा डिझाईन काढू शकतात.

हेही वाचा: Republic day 2023 : राष्ट्रीय सणाला तोंड गोड करणाऱ्या जिलेबीचा इतिहास आहे परदेशी

republic day rangoli idea

republic day rangoli idea

एक गोल काढून त्याच्या अवतीभोवती पांढऱ्या रांगोळीचे डॉट्स असलेली ही रांगोळी खूप छान दिसते आहे, छोट्याश्या जागीही ही रांगोळी शोभून दिसेल.

हेही वाचा: Republic Day Special Recipe : खास प्रजासत्ताकदिनी नाश्त्याला बनवा तिरंगा पोहे

republic day rangoli idea

republic day rangoli idea

मोराचे डिझाईन प्रत्येकाला आपल्या रांगोळीत आवडतात. शिवाय मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ही रांगोळीही काढू शकतात.

हेही वाचा: Republic Day 2023 : घटनादुरुस्तीच्या 'या' 3 पद्धती तुम्हाला महितीयेत का?

republic day rangoli idea

republic day rangoli idea

अनेकदा आपल्याला रांगोळी काढायची खूप इच्छा असते पण वेळेचा अभाव असतो, म्हणून ही रांगोळी.. एका पद्धतीने कळी उघडल्या सारखी ही रांगोळी दिसते आहे.

फक्त या रांगोळ्या काढतांना त्या पायाशी येणार नाहीत, कोणाकडून त्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्या, कारण शेवटी त्यात आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग आहेत.