Republic Day 2023 :चवही अन् सेलिब्रेशनही! बोटं चाटत राहाल असा रिपब्लिक डे स्पेशल नाश्ता breakfast ideas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic Day Breakfast Ideas

Republic Day 2023 : चवही अन् सेलिब्रेशनही! बोटं चाटत राहाल असा रिपब्लिक डे स्पेशल नाश्ता

Republic Day Breakfast Ideas: प्रजासत्ताक दिवस सगळीकडे जोशात साजरा होतो आहे. तुम्हीही आपल्यासाठी छान आउटफिट घेऊन, घर सजवून, रांगोळ्या काढून आणि छान छान तिरंग्याचे पदार्थ बनवून आपला प्रजासत्ताक साजरा करू शकतात. यासाठी बनवा खास तिरंगा सँडविच.

हेही वाचा: Republic Day 2023 : राष्ट्रीय सणाला घर असं सजवून घ्या खास फील

बनवायला अगदी सोप्पे, कोणताही फूड कलर बनवता तयार केलेले हे सँडविच खूप हेल्दी आहेत. शिवाय तुम्ही हे डब्यालाही घेऊन जाऊ शकतात किंवा नाश्ता म्हणूनही खाऊ शकतात. बघूया याची रेसिपी..

हेही वाचा: Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण का होत नाही? संविधानात दडलं आहे कारण

साहित्य: 

१. ६ ब्रेड स्लाईस

२. १ टीस्पून व्हेज मेयोनीस

३. १ टीस्पून पुदिना चटणी

४. १ टीस्पून टोमॅटो केचअप

हेही वाचा: Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाचा आउटफिट शोधताय? इथे आहेत २०० रुपयांच्या आतले ड्रेसेस

कृती: 

१. ब्रेड स्लाईस घ्या, त्याच्या बाजूच्या कडा कापून घ्या. 

२. आता एका स्लाईसला हिरवी चटणी लावा. दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो केचप लावा. तिसऱ्या स्लाईसला मेयोनेज लावा.

३. आता हिरवी चटणी लावलेला स्लाईस खाली ठेवा. त्यावर मेयोनीस लावलेला स्लाईस ठेवा अन् वर टोमॅटो केचप लावलेला स्लाईस उलटा ठेवा म्हणजे वरची बाजू प्लेन येईल. 

४. बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला कळलं आता त्यात आपल्या आवडत्या भाज्या घाला 

५. तुम्हाला याला ग्रील करायचं असेल तर तुम्ही ग्रील सुद्धा करू शकतात. तिरंगा सँडविच सर्व्ह करा.

हेही वाचा: Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश वापरा..!