
मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरेंना आवडली गुजरातची पटोला साडी
रश्मी ठाकरे यांच्या साड्यांची चर्चा नेहमीच सोशल मी़डियावर चालू असते. त्यांच्या साड्यांची चॉईस अतिशय छान आहे. सध्या त्या चक्क गुजरातच्या पटोला साडीच्या प्रेमात आहेत. नुकतेच रश्मी ठाकरे यांनी मुंबईत पटोला साडीच्या दुकानाचे उद्घाटन केले.पाटणच्या राजवी कुमार पाल यांनी बनवलेला पटोला आता मुंबईतील ब्रीच कँडीसारख्या पॉश भागात पोहोचला आहे.
हेही वाचा: आम्हाला मुलबाळ नकोच... का म्हणतात महिला असं!

पटोला साड्या पाहताना रश्मी ठाकरे
पाटणच्या अशोक कुमार साळवी यांचे सुपुत्र निर्मल साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाटणचा हा वारसा जगभर प्रसिद्ध व्हावा या उद्देशाने अहमदाबाद येथील सिंधुभवन मार्गावर सुमारे चार वर्षांपूर्वी ‘पटोला बाय निर्मल साळवी’ नावाचे शोरूम उघडले होते. या काळात अनेक व्यावसायिक आणि सेलिब्रिटी पटोल्याच्या कलाकुसरीने आणि डिझाइनकडे आकर्षित झाले. आणि पटोला ही एक नाविन्यपूर्ण फॅशन म्हणून स्वीकारली.
निर्मल साळवी यांनीही पाटणच्या ऐतिहासिक वारसा सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी मुंबईत आधुनिक शोरूम करण्याचा निर्णय घेतला. "निर्मल साळवी यांचा पटोला" या शो-रूमचे उद्घाटन 5 मार्च (शनिवार) रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झाले.
हेही वाचा: महिला दिन का साजरा केला जातो ? यावर्षीची थीम जाणून घ्या!

रश्मी ठाकरे यांनी उद्घाटनाच्या वेळी पटोला साडी नेसली होती.
पटोल्याचं महत्त्व जाणणाऱ्या रश्मी ठाकरे यांनी उद्घाटनाच्या वेळी पाटणची पटोला साडी नेसली होती . उद्घाटन समारंभाला मुंबईतील ख्यातनाम आणि नामांकित व्यापारी वर्ग उपस्थित होते त्यांनी निर्मल साळवी, अशोकभाई साळवी, विरलभाई साळवी आणि अर्पित पटेल यांचे कौतुक केले आणि त्यांच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या
Web Title: Rashmi Thackeray Wife Of Cm Uddhav Thackeray Likes Patola Saree
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..