esakal | कच्च्या दुधाचे सुंदर त्वचेसाठी चमत्कारी फायदे; वाचून व्हाल थक्क
sakal

बोलून बातमी शोधा

raw milk for skin

कच्च्या दुधाचे सुंदर त्वचेसाठी चमत्कारी फायदे; वाचून व्हाल थक्क

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तुमच्या त्वचेसाठी तसेच चेहरा सुंदर बनवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. कच्चे दूध चेहऱ्यासाठी तसेच त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम यासारखी तत्वे असतात. याचा टोनर म्हणून तेलकट त्वचेसाठी उपयोग होऊ शकतो. यासाठी थोड्याश्या कच्च्या दुधात काही थेंब लिंबाचे रस मिसळा. या मिश्रणाला चेहरा आणि मानेला लावा आणि काही वेळाने गरम पाण्याने चेहरा धुवा.

मध मिसळून लावा

त्वचा साफ करण्यासाठीही तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करु शकता. यासाठी दुधात थोडेसे मध मिसळून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.

गव्हाचा जाडा रवा मिसळा

तुम्हाला ब्लॅकहेडची समस्या असेल तर कच्च्या दुधात गव्हाचा जाडा रवा मिसळा. याची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावा. ब्लॅकहेड्स दूर होतील.

चंदन पावडर मिसळा

चेहऱ्यावर उजाळा आणण्यासाठी कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून चेहऱ्याला आणि मानेला लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसांतच चेहऱ्यावर तजेला येईल.

उत्तम क्लिंझर

कच्च्या दुधाचा वापर क्लिंझर म्हणूनही केला जाऊ शकतो. चेहऱ्यावरील तेल, चिकटपणा, ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर फायदेशीर आहे.

loading image
go to top