Makar Sankranti 2021: मकर संक्रांत साजरी करण्यामागचं जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिवशी 'मकर संक्रांती' असे म्हणतात. आपल्या हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो.

पुणे : प्रत्येक सणाला काही ना काही ऐतिहासिक महत्व असतोच. त्यातीलच महाराष्ट्रातील मकर संक्रांत हा एक सण. मकर महिन्यात कृष्णा पंचमीवर देशातील राज्यांमध्ये मकर संक्रांती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मकर संक्रांती साजरी करत असालच बरोबर ना. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? याला मकर संक्रांती का म्हणतात? आणि ती का साजरी केली जाते? चला तर मग तेच जाऊन घेऊयात. 

मकर संक्रांतीमधील 'मकर' हा शब्द मकरराशीला संबंधित आहे. तर 'संक्रांती' याचा अर्थ संक्रमण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीपासून मकर राशीत प्रवेश करतो. एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करत असल्यामुळे त्यास संक्रांती असे म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिवशी 'मकर संक्रांती' असे म्हणतात. आपल्या हिंदू महिन्यानुसार, मकर संक्रांती उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो.

हे ही वाचा : Makar Sankranti 2021 : तिळा-गुळाच्या गट्टीचं काय आहे आरोग्यदायी महत्त्व?

महाराष्ट्रातील मकर संक्रांत

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जातात. संक्रांतीच्या या दिवसात आपल्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि लहान मुलांना तिळगूळ वाटतात. तसेच स्त्रिया या दिवशी 'तिळगूळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. संक्रांतीपासून रथसप्तमी हा हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. या दिवसात मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.

संक्रांतीमध्ये आहाराला खूप महत्त्व 

मकर संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. या दिवसात थंडीला सुरवात होते. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाली जाते. तसेच बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो.

हे ही वाचा : Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?

तिळगुळ देऊन स्नेह वाढवला जातो

या दिवशी तिळगुळ देऊन स्नेह वाढवला जातो. नवीन नाती जोडली जातात. जुने असलेले नाती समृद्ध केली जातात. त्यामुळे जुने राग, द्वेष आणि वाद विसरून नव्याने नात्याची सुरवात केली जाते.  

हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण

मकर संक्रांतीपासून वसंत ऋतुला सुरुवात होऊन बीजांना अंकुर फुटतात. तसेच खरीप पिकांची कापणी झालेली असते आणि रबी पिकांची पेरणी सुरु होते. यामुळे शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सण असतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reason Behind Celebration Of Makar Sankranti