Relation Tips : त्याला ब्रेकअप करायचंच आहे? अशावेळी या गोष्टी तूम्हाला करतील मदत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relation Tips

Relation Tips : त्याला ब्रेकअप करायचंच आहे? अशावेळी या गोष्टी तूम्हाला करतील मदत!

सध्या रिलेशन बनवण्यापेक्षा ते तोडणे सोपे झाले आहे. रिलेशन बनवताना मेहनत घ्यावी लागते पण तोडताना केवळ ‘ब्रेकअप’ हा एक शब्द उच्चारायचा आणि संपलं सगळं. आजच्या तरूण पिढीत, ती ऐकत नाही, तो पझेसिव्ह आहे, तो मला मित्र, मैत्रिणींशी भेटू देत नाही, म्हणून मला ब्रेकअप करायच आहे?  

आजकालच्या ब्रेकअपची ही कारणे आहेत. मात्र, जर तुमच्या जोडीदारालाही तुमच्यासोबत ब्रेकअप करायचे असेल. त्यामुळे रिलेशनशिपच्या 4 सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या दोघांमधील दुरावा दूर करू शकता.

पार्टनर जेव्हा ब्रेकअपचा उल्लेख करतो तेव्हा बहुतेक लोक घाबरतात. अशा वेळी अनेकजण रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. पण, अशावेळी गरज असते ती शांत राहण्याची. त्यामूळे चला तर मग जाणून घेऊया ब्रेकअपच्या निर्णयाला सामोरे जाण्यासाठी काही सोप्या रिलेशनशिप टिप्स.

आधी त्याचं ऐकून घ्या मग उत्तर द्या

आधी त्याचं ऐकून घ्या मग उत्तर द्या

काही लोक रागावतात आणि ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी जोडीदाराच्या निर्णयामुळे त्रस्त होऊन लोक ब्रेकअपच्या कारणाकडे दुर्लक्ष करतात. पण ब्रेकअपचे कारण जाणून घेतल्यास तुम्ही ब्रेकअप थांबवू शकता. त्यामूळे शांत डोक्याने जोडीदाराशी बोला आणि त्यांच्याकडून ब्रेकअपचे कारण जाणून घ्या.

जोडीदाराला इग्नोर करून प्रश्न सुटणार नाहीत

जोडीदाराला इग्नोर करून प्रश्न सुटणार नाहीत

एक संधी द्या

ब्रेकअप थांबवण्यासाठी तूम्ही दोघांनी मिळून नात्याला दुसरा चान्स देणेही गरजेचे आहे. नात्यात ओढ, प्रेम असेल तर ते दोन्ही बाजूने असावं लागतं. म्हणूनच ब्रेकअपसारखा भूकंप थांबवण्यासाठी एकमेकांना एक संधी देऊन बघा. कारण ही संधी कदाचित तुमचे नाते तुटण्यापासून वाचवू शकते.

जोडीदाराच्या वागण्याकडे लक्ष द्या

जोडीदार ब्रेकअपचा विचार करतो आणि तुमच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. त्यामुळे ब्रेकअप पर्यंत येण्याआधी जोडीदारासोबत चर्चा करा. जर त्यांना या नात्यात रस नसेल तर. त्यांना वेगळं होऊ द्या. कारण, तुम्ही एकतर्फी प्रेमात कधीही आनंदी राहू शकणार नाही.

राग बाजूला ठेवा

काही लोक रागावतात आणि ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतात. त्यावेळी जोडीदाराच्या निर्णयामुळे त्रस्त होऊन लोक ब्रेकअपच्या कारणाकडे दुर्लक्ष करतात. पण ब्रेकअपचे कारण जाणून घेतल्यास तुम्ही ब्रेकअप थांबवू शकता. त्यामूळे शांत डोक्याने जोडीदाराशी बोला आणि त्यांच्याकडून ब्रेकअपचे कारण जाणून घ्या. शांत राहून प्रॉब्लेमकडे पहा.

चूक नसेल तर माफी मागू नका

काही गोष्टी जोडीदाराला ब्रेकअपचा निर्णय बदलण्यास भाग पाडू लागतात. जर चूका तूमच्याकडून होत असतील तर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर माफी मागायला काहीच हरकत नाही. पण कोणतीही चूक न करता नातं टिकावं म्हणून माफी मागणं चुकीच आहे. यामुळे तुमचे नाते पोकळ तर होतेच पण तुमचा स्वाभिमानही धोक्यात येतो. म्हणूनच नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी जोडीदारावर जबरदस्ती करू नका.  

ब्रेकअपचे कारण महत्त्वाचे

काहीवेळा जोडीदाराचे तूमच्यावर प्रेम नसते. पण, उगीच ट्रेंड म्हणून नाते बनवले जाते. आणि इतर कोणी आवडले तर नाते तोडले जाते. तूम्ही मात्र खरे प्रेम करत असता. त्यामूळे रिलेशनशीपमध्ये येण्याआधीच खऱ्या प्रेमाची जाणिव होऊद्या. निर्णय घ्यायला घाई करू नका.