Relationship tips : डेटवर इंप्रेशन डाऊन करायचं नसेल तर या चुका टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship tips

Relationship tips : डेटवर इंप्रेशन डाऊन करायचं नसेल तर या चुका टाळा

Mistakes in Date : डेटवर जाताना जोडीदाराला इंप्रेस करायाचं ही प्रत्येकाची सूप्त इच्छा असते. पण अनावधानाने काही चुका होतात. त्या चुका कोणत्या आहेत, त्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून काय केले पाहिजे आणि आपले इंप्रेशन डाऊन होण्यापासून कसे वाचावे हे सांगत आहोत

हेही वाचा: Relationship Tips: योग्य जोडीदार हवाय? 'हे' ४ प्रश्न नक्की विचारा

१. वेळ द्या

जेव्हा तुम्ही डेटिंग करता तेव्हा समोरील व्यक्तीला वेळ देणे खुप महत्त्वाचे आहे. डेटिंग करत असताना दोन्ही व्यक्ती एकमेकांना जोडीदाराच्या नजरेने पाहत असतात. त्यामुळे त्याच्या विचारांना न दुखवता त्या व्यक्तीला मान दिला पाहिजे आणि आपले विचार देखील मांडले पाहिजे. समोरचा व्यक्ती तुमच्या वागण्याचं परिक्षण करत असते म्हणूनच असं कोणतेही गैरवर्तन करु नका.

हेही वाचा: Relationship : टाळेबंदीमुळे ६६ टक्के पतींचे प्रथमच स्वयंपाकघरात पाऊल

२. ओव्हरशेअरिंग करणं टाळा

डेटिंग करताना आपण पहिल्यांदा समोरील व्यक्तीला भेटतो. तेव्हा भावनेच्या भरात अतिरिक्त खाजगी माहिती देणे बरोबर नाही. कुठली गोष्ट कुठे बोलली पहिजे, किती बोलली पाहिजे हे आपल्यालाच समजलं पाहिजे. तुम्ही चुकीची किंवा जे बोलायचं नाही असं बोलून बसलात तर अशा वागण्याने कदाचित ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकेल.

हेही वाचा: Relationship : प्रेमात पडल्यावर घडतील या गोष्टी

३. योग्यता सिद्ध करण्याची गरज नाही

समजूतदारपणा असेल तरच तुमचं नातं हेल्दी राहू शकतं. तुम्ही इतरांसोबत स्वत:ची तुलना करण्यात वेळ वाया घालवू नका. नेहमी लक्षात ठेवा की डेटिंग करताना समोरील व्यक्तीला प्रभावित करण्यापेक्षा त्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी तसे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: Relationship: पार्टनरला तुम्ही नकोसे वाटतायं? जाणून घ्या लक्षणे

४. निवडकर्ते होऊ नका

डेट करताना समोरील व्यक्तीची निवड करण्याऐवजी मी त्या व्यक्तीसाठी योग्य आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचारा. एखाद्याची निवड करणे खुप सोपं आहे. पण आपण या त्या व्यक्तीसाठी तुम्ही खरंच योग्य आहात का याचं उत्तर शोधणे थोडं कठीण आहे.

हेही वाचा: Relationship : तुमच्या ऑफिसमध्ये अफेअर आहेत? मग वाचाच

५. काल्पनिक जगात नाही वास्तवात जगा

डेट करताना समोरील व्यक्तीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला याचा अर्थ असा होत नाही की ती तुमच्यासोबत पुर्ण आयुष्य घालवायला तयार आहे. त्यावेळेस काल्पनिक विचारात न जगता वास्तवात जगा.

हेही वाचा: Relationship Tips: तुमचा नवरा बेस्ट अन् परफेक्ट आहे का?

६. थेट संवाद

कुणाला डेट करताना तुम्ही समोरच्याने तुमच्या मनातील सर्व काही ओळखावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची ही अपेक्षा चुकीची आहे. तुम्ही तुमच्या लिमिटेशन्स आणि तुमच्या इच्छा, भविष्यातील स्वप्न आधीच बोलून स्पष्ट करणं गरजेचं आहे. थेट बोलणं कधीही चांगलं असतं

टॅग्स :LoverRelationship Tips