लव्ह मॅरेजला आई-वडिलांचा विरोध आहे?

तुमच्याही लव्ह मॅरेजला कुटुंबाचा नकार आहे का?
love
lovee sakal

आजकाल लव्ह मॅरेज love marriage करणं फारसं कठीण राहिलेलं नाही. मुलगा असो वा मुलगी आपल्या पसंतीनुसार जोडीदाराची निवड करु लागले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी पाश्चात्य पद्धत म्हणून ओळखली जाणारी ही लग्न पद्धत हळूहळू भारतातही चांगलीच रुजू लागली आहे. त्यामुळे गेल्या काही काळात लव्ह मॅरेज करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. विशेष म्हणजे अनेक घरात लव्ह मॅरेज करायला सहज परवानगी मिळते. मात्र, काही ठिकाणी अजूनही कुटुंबीय प्रेम विवाह करण्यास तयार नसतात. जर तुमच्याही घरी अशीच परिस्थिती असेल आणि पालकांचा लव्ह मॅरेजला विरोध असेल तर या समस्येवर तोडगा कसा काढायचा ते जाणून घेऊयात. थोडक्यात काय तर लव्ह मॅरेजसाठी आई-वडिलांची परवानगी कशी मिळवायची हे पाहुयात. (relationship-tips-how-to-make-your-parents-agree-for-your-love-marriage-ssj93)

१. कुटुंबातील जवळच्या सदस्याला सांगा -

लव्ह मॅरेज करताना आई-वडिलांची संमती हवी असेल तर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा तरी तुम्हाला पाठिंबा असण्याची गरज आहे. त्यामुळे वेळ पडल्यावर तुमची बाजू मांडू शकेल किंवा आई-वडिलांना समजावू शकेल अशा व्यक्तीला तुमच्या नात्याविषयी सांगा. परंतु, ही व्यक्ती तुमची विश्वासू व जवळची असणं अत्यंत गरजेचं आहे. जर ही व्यक्ती निवडताना तुम्ही चूक केली तर कदाचित त्याचे उलट परिणाम दिसू शकतात. त्यामुळे विश्वासू व्यक्तीचीच निवड करा.

love
पहिल्यांदाच डेटवर जाणाऱ्या मुलींनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी

२. आई-वडिलांना कल्पना द्या -

आपल्या गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडला थेट घरी नेण्यापेक्षा प्रथम त्यांच्याविषयी घरात सकारात्मक वातावरण निर्मिती करा. आपल्या आयुष्यात मैत्रीपलिकडे एखादी व्यक्ती आहे हे तुमच्या बोलण्यातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही पार्टनरची पहिल्यांदाच कुटुंबासोबत भेट घडवून द्याल त्यावेळी त्यांच्यात सुसंवाद घडेल.

३. कुटुंबासोबत भेट घडवा -

घरी तुमच्या नात्याची कल्पना दिल्यानंतर बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडची आई-वडिलांसोबत ओळख करुन द्या. या भेटीमुळे पालकांना तुमच्या पार्टनरच्या स्वभावाचा अंदाज येईल. तसंच पार्टनरलादेखील तुमचं कुटुंब कसं आहे हे समजेल. तसंच या दोघांमध्ये मैत्रीचं नातं तयार होण्यास सुरुवात होईल ज्यामुळे तुमच्या लग्नाचा मार्ग आपोआप मोकळा होईल.

४. मैत्रीपलिकडचं नातं आहे हे सांगा -

अनेकदा आपण इतर मित्रमैत्रिणींसोबत पार्टनरची ओळख सुद्धा मित्र म्हणूनच करुन देतो. त्यामुळे पालकांना तुमच्या मैत्रीतील नेमका अर्थ उलगडत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीसोबत तुमचं मैत्रीपलिकडचं नातं आहे हे आई-वडिलांना सांगायचा प्रयत्न करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com