Relationship Tips: 'या' 5 गोष्टींतून कळेल तुमचा पार्टनर कमिटेड आहे की नाही ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips

Relationship Tips: 'या' 5 गोष्टींतून कळेल तुमचा पार्टनर कमिटेड आहे की नाही ते

Signs of a committed relationship: कुठल्याही रिलेशनशिपमध्ये विश्वास हा महत्वाचा असतो. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडप्याला आपला पार्टनर आपल्यासोबत प्रामाणिक राहावा असे वाटणं साहाजिक आहे. मात्र तुम्ही प्रामाणिक असले तरी तुमचा पार्टनर तुमच्याशी प्रामाणिक आहे की नाही कसे ओळखाल?

प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने रिलेशनशिपमधून आलेल्या नैराश्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे कळते आहे. तेव्हा तुमच्या बाबतीत तुमची अशी मानसिक कुचंबना होण्याआधीच तुमचा पार्टनर कमिटेड आहे की नाही ते या पाच गोष्टींतून ओळखण्यास तुम्हाला मदत होईल. (Relationship Tips)

एकामेकांची साथ

जेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही एकमेकांची साथ द्यायला हवी. तुम्ही तुमच्या पार्टनरला मेंटली सपोर्ट करायला हवं. पार्टनरच्या पाठीशी कायम उभे राहा. गरज असताना त्याच्या मदतीला तयार राहा.

कठीण काळी अशी द्या साथ

तुम्ही रिलेशनशिमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरची कायम साथ द्या. कठीण काळात तुमच्या पार्टनरच्या भावना समजून घ्या.

सीक्रेट्स शेअर करा

कमिटेड पार्टनर तुम्हाला कायम सीक्रेट्स शेअर करेल. तुम्ही कोणाला सांगू न शकणाऱ्या गोष्टी तुमच्या पार्टनरला शेअर करू शकता. असे केल्याने तुमचा मानसिक तणाव कमी होतो.

फ्यूचर प्लान शेअर करणे

तुमच्या भविष्यातील नियोजन तुमच्या पार्टनरला शेअर करा. तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात तर लाँग टर्म प्लानिंगवर विश्वास ठेवायला हवा.

कॉलिटी टाइम सोबत घालवा

तुमच्या नात्यात कॉलिटी टाईम सोबत घालवणे फार महत्वाचे असते. तुमचा पार्टनर त्याच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढत जर तुम्हाला वेळ देत असेल तर तो खरा पार्टनर असून कमिटेड आहे असं समजा.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

वरील पाच क्लॉलिटीज तुमच्या पार्टनरमध्ये असेल तर नक्कीच तुमचा पार्टनर कमिटेड आहे. तसेच नात्यातील गुंता सोडवण्यासाठी शांतपणे एकमेकांशी बोलण्याची गरज आहे. जीव गमावणे हा पर्याय त्यावर नसू शकतो. तेव्हा नात्यात विश्वास आणि डेडिकेशन असावं.