Shraddha Murder Case: रिलेशनशिपमध्ये तुम्ही तर या चुका करत नाही ना? श्रद्धाच्या याच चुकांनी...

श्रद्धाप्रकरणाप्रमाणे आणखी एक नवं प्रकरण पुढे येण्याआधीच रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांनी या काही गोष्टी लक्षात ठेवत सावध व्हा
Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal

Relationship Tips: देशभऱ्यात चाललेलं सध्या खळबळजनक प्रकरण म्हणजे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण. या प्रकरणाने सगळ्यांना मोठा धक्का बसला असून अनेकांच्या मनात प्रेमसंबंधांबाबत अनेक प्रश्चचिन्ह उभे झाले आहेत. प्रेम करणारा पार्टनर शरीराचे ३५ तुकडे करेल हा विचारही थरारक ठरतो. श्रद्धाप्रकरणाप्रमाणे आणखी एक नवं प्रकरण पुढे येण्याआधीच रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांनी या काही गोष्टी लक्षात ठेवत सावध व्हा.

श्रद्धा तिच्या पार्टनरसोबत लीव ईन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर लीव इन रिवलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या लोकांना मोठा धक्का बसला होता. माध्यामांकडून पुढे आलेल्या माहितीनुसार, श्रद्धा तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करू इच्छित होती. कारण तिचा बॉयफ्रेंड तिचा मानसिक झळ करत होता. तुम्हालाही रिलेशनशिपमध्ये असा त्रास जाणवतोय का?

अनेकदा ब्रेकअप मागताच पार्टनर मारून टाकण्याच्या धमक्या देतो. श्रद्धाच्या बाबतीतही हेच झालं. तिने ब्रेकअपविषयी बोलताच आफताबने मारण्याची धमकी दिली.

श्रद्धाची हीच चूक तिला महागात पडली,

पार्टनरच्या या घाण सवयी वेळीच लक्षात घ्या

१. २०२० मध्ये श्रद्धा तिच्या कुटुंबापासून वेगळी आफताबसोबत राहू लागली. आधी श्रद्धा मुंबईत तिच्या आई आणि भावासह राहात होती. श्रद्धाचे वडील तिच्या आईपासून वेगळे राहात होते. २०१९ मध्ये ती कुटुंबाविरोधात आफताबसोबत लीव इनमध्ये राहू लागली.

२. निमूटपणे सहन करणे

आफताबने हिंचाराच्या सगळ्या मर्यादा पार केल्या होत्या. तो श्रद्धाची मारझोड करायचा. श्रद्धाच्या चेहऱ्यावर ते साफ दिसून यायचे. आफताब फार कंट्रोलिंग नेचरचा होता. तो श्रद्धाकडून बऱ्याच गोष्टींची कबूली करून घ्यायचा असे त्याच्याच एका मित्राने सांगितले.

३. फोनवर मित्रांशी बोलू न देणे

श्रद्धाच्या एका मैत्रिणीने खुलासा केला की आफताब कायम श्रद्धाचा फोन चेक करत राहायचा. तो मित्रांना भेटूही द्यायचा नाही. तसेच चॅटिंग करू देत नव्हता.

Shraddha Murder Case
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

४. मुलींनी या चुका टाळा

  • पार्टनरच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणे

  • शारिरीक हिंसा आणि गैरव्यवहार होत असल्यास तक्रार करा

  • पब्लिक प्लेसवरही तुमचा पार्टनर तुमचा अपमान करत असल्यास तो मानसिक रूग्णही असू शकतो.

  • कपड्यांवरून तुम्हाला जज करत असल्यास अशा पार्टनरशी संबंध तोडावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com