

ज्यावेळी दोन व्यक्ती एकत्र येतात त्यावेळी त्यांच्यात प्रेम, आपुलकी, वाद, मतभेद अशा अनेक गोष्टी घडत असतात. परंतु, वादाचं मूळ कारण वेळीच समजलं तर भविष्यात घडणाऱ्या अनेक चुका सहज टाळल्या जाऊ शकतात. यात अनेकदा मुलांची तक्रार असते की गर्लफ्रेंड सतत वाद घातले किंवा चिडचिड करते. मात्र, ही तक्रार करण्याऐवजी ती असं का वागते त्यामागचं कारण जाऊन घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणूनच, बॉयफ्रेंडच्या कोणत्या गोष्टींचा मुलींना खरा राग येतो ते पाहुयात. (relationships-the-biggest-turn-offs-for-women)
१. लांब नखे -
अनेक मुलांना मुलींप्रमाणे हाताच्या बोटांची नखं वाढवायला आवडतात. यात खासकरुन अनेक मुले करंगळी आणि अंगठ्याचं नख वाढवतात. परंतु, मुलींना ही गोष्ट अजिबात आवडत नाही. मुलांच्या पर्सनालिटीला अशी नखं शोभून दिसत नाही असं मुलींचं मत असतं. त्यामुळे बॉयफ्रेंडची नखं वाढलेली असतील तर अनेकदा मुली चिडचिड करतात. त्यामुळे जर एखाद्या मुलीला डेट करायचा विचार करत असाल तर पहिले नखे कापून जा.
२. शरीराची दुर्गंधी -
उन्हात जास्त काळ फिरल्यामुळे, श्रमाची काम केल्यामुळे किंवा एखादा तिखट, गरम पदार्थ खाल्ल्यामुळेही अनेकांना घाम येतो. यात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना घाम येण्याचं प्रमाण जास्त असतं. मात्र, बॉयफ्रेंडच्या शरीरातून सतत घामाची दुर्गंधी येत असेल तर मुली इरिटेट होतात. ज्यामुळे यावरुन वाददेखील होऊ शकतो. त्यामुळे गर्लफ्रेंडला भेटताना किंवा डेटवर जाताना आपल्या शरीरातून घामाची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्या. तसंच परफ्यूम, माऊथ फ्रेशनर यांचा वापर करा. ज्यामुळे तोंड, शरीर यातून दुर्गंधी येणार नाही. इतकंच नाही तर पायातील मोजेदेखील चेंज करुन जा. कारण, अनेकदा मोज्यांमधूनही दुर्गंधी येत असते.
३. सतत बोलणे -
जर तुम्ही सतत बडबड करत असाल तर एका ठराविक काळानंतर गर्लफ्रेंडला तुमचा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे तुमचे विचार, भावना यांना काही काळासाठी आळा घाला. ज्याप्रमाणे तुम्हाला बोलायला आवडतं. त्याचप्रमाणे गर्लफ्रेंड काय सांगते त्याकडेही लक्ष द्या. तिलादेखील बोलायची संधी द्या. मुलींना बोलकी मुलं आवडतात. पण कारणाशिवाय वायफळ आणि सतत बडबड करत असाल तर मुली तुम्हाला कंटाळू शकतात.
४. लक्ष न देणे -
एखाद्याशी बोलत असताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून संवाद साधला तर त्यातून तुमचा कॉन्फिडन्स दिसत असतो. आणि, मुलींना अशीच कॉन्फिडन्स असलेली मुलं जास्त आवडतात. त्यामुळे गर्लफ्रेंडसोबत बोलत असताना तुमचं लक्ष इतरत्र असेल तर नक्कीच ती चिडू शकते. किंवा, तुमचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही असा तिचा समज होऊ शकतो. याच गैरसमजातून पुढे वाद होऊ शकतात. त्यामुळेच संवाद साधताना तो एकांगी होणार नाही याची काळजी घ्या.
५. प्रत्येक गोष्टीत घाई करणे -
कोणतंही नातं यशस्वी होण्यासाठी काही टप्पे पार करावे लागतात. मात्र, काही जणांना अगदी झटपट निर्णय घेण्याची सवय असते. पहिल्याच डेटमध्ये काही मुलं लग्नाचा विचार करतात. परंतु, तुमची ही सवय मुलींना खटकू शकते. त्यामुळे तुमचा उत्साह, विचार कंट्रोलमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.