मुलांचं मोबाईलचं व्यसन सोडवायचंय का? मग हे वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

मुले पालकांचेच अनुकरण करत असतात. पालकांना बघूनच ते विविध गोष्टी शिकत असतात. जर आई-वडीलच सतत मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलांना देखील हीच सवय लागणार.

आजकाल लहान मुले मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहेत. एकप्रकारे त्यांना याचे व्यसनच जडले आहे. परंतु, लहान मुलांची हीच सवय त्यांच्यावर जीवावर बेतणारी आहे. कारण मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे मुलांच्या मेंदूवर, डोळ्यांवर आणि संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. तंत्रज्ञानामुळे होणारे हे नुकसान माहित असूनही बहुतांश पालक आपल्या मुलांना या व्यसनातून बाहेर मात्र काढू शकत नाहीत. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण आपल्या मुलांना सहज मोबाईलपासून दूर ठेवू शकता.

मैदानावर खेळायला सोडा..
हल्लीच्या लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने मुले घरीच खेळतात. यामधील बहुतांश वेळ ते गॅझेट्ससोबतच घालवतात. पण मुलांना मोकळ्या हवेत आणि ऐसपैस खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली पाहिजे. त्यासाठी मुलांना वरचेवर बागेत खेळायला घेऊन जा. त्यांना मोबाईलपेक्षा प्रत्यक्षातील खेळाची मजा अनुभवू द्या. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ट्रेंड होतोय 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'

मुले आपले अनुकरण करतात...
मुले पालकांचेच अनुकरण करत असतात. पालकांना बघूनच ते विविध गोष्टी शिकत असतात. जर आई-वडीलच सतत मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलांना देखील हीच सवय लागणार. हे टाळण्यासाठी पालकांनीच मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे. तरच मुले याचे अनुकरण करणे टाळतील. याऐवजी पालकांनी दिवसातील काही वेळ हा पुस्तक वाचनात घालवायला हवा. मुले त्याचे अनुकरण करतील आणि मोबाईलपासून दूर राहतील. 

मोबाईलला पासवर्ड लावा...
तुम्ही नसताना मुले तुमचा मोबाईल घेत असतील तर त्यांच्या या कृतीला आळा घातला पाहिजे. यासाठी मोबाईलला पासवर्ड लावून ठेवा. त्यामुळे, तुम्ही आजूबाजूला नसलात तरी मुलं हातात मोबाईल घेणार नाहीत.

लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना…
लहान मुलांना तुम्ही मोबाईल हाताळायला देत असाल तर कमी रेडिएशन लेव्हल असलेला मोबाईल वापरायला हवा. *#07# हा नंबर डायल करून आपण आपल्या मोबाईलचं स्पेसिफीक अॅब्सॉरप्शन रेट (SAR) पाहू शकता. 1.6 W/kg हा सर्वाधिक SAR आहे.

हेही वाचा - कोरोना लस कधी येणार? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत दिली माहिती

मोबाईलमुळे हे दुप्ष्परिणाम होऊ शकतात...

- ब्रेन ट्युमर
आपल्या मेंदूवर मोबाईलमधून निघणाऱ्या electromagnetic रेडिएशनचा थेट परिणाम होत असतो. संशोधनानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता जास्त असते.

- एकाग्रतेचा अभाव
मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शरीरावर शारीरिक आणि मानसिक ताणामुळे वापरकर्त्यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remedies to eradicate children addiction of mobile