
Republic Day 2025: आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आहे. आज भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा करण्यात आला. हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी 1950 मध्ये भारताला संविधान मिळाले, त्यानंतर भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत तिरंगा फडकवून परेडचे उद्घाटन केले. यावेळी कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. नेहमीप्रमाणे यावेळीही पीएम मोदी अगदी वेगळ्या अंदाजात दिसले. आज पुन्हा एकदा त्यांच्या पगडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. चला तुम्हाला त्याचा पूर्ण लुक कसा होता.