Keratin Treatment: केसांना केराटिन केल्यास होऊ शकतो किडनीचा त्रास? नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती आली समोर

Keratin Treatment: केराटिन उपचार केल्याने किडनीसंबंधि समस्या निर्माण होऊ शकतात असे नव्या अभ्यासात समोर आले आहे.
Keratin Treatment
Keratin TreatmentSakal

Research keratin hair treatment can cause kidney issues read what new study suggests

अनेकांना आपले केस मऊ, सरळ, घनदाट असावेत असे वाटते. यासाठी लोक विविध उपचार घेतात. सध्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केराटिन उपचार अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. पण हा उपचार आरोग्यासाठी घातक ठरू शकतो असे नव्या अभ्यासात समोर आले आहे.

द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनच्या संशोधक पत्रकानुसार केराटिनमध्ये ग्लायऑक्सिलिक अॅसिड (Glycoxylic Acid) मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे केस मजबूत होतात. पण त्याच्यामुळे किडनीमध्ये ऑक्सलेट क्रिस्टल्स (Oxalate Crystals) जमा होऊन किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

  • केराटिन उपचार म्हणजे काय?

केराटिन उपचारामध्ये केस दीर्घकाळासाठी स्ट्रेट केले जातात. या उपचारामुळे केस चमकदार, मऊ दिसतात. केसांमधील केराटिन टिकवून ठेवण्यासाठी खास प्रकारचे शॅम्पू वापण्याचा सल्ला दिला जातो. पण काही दिवसांनंतर केस पूर्ववत होतात आणि केस गळण्याची समस्या वाढते.

या समस्येवर पुढील डॉक्टरांनी आपली मते मांडली आहेत

  • डॉ. प्रतिक शेटे (एम डी मेडिसिन; डी एम नेफ्रोलॉजी) नाशिक

केराटिन हेअर ट्रीटमेंट आजकाल सौंदर्य विश्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याचे फायदे आपल्याला माहित आहेतच. काही नवीन संशोधनानुसार त्याचा संबंध किडनी विकाराशी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

NEJM च्या संशोधक पत्रकानुसार केराटिनमध्ये 'Glyoxylic Acid' मुबलक प्रमाणात उपलब्ध असते; जे केसांना मजबुती देतात. त्याच्यामुळे किडनीमध्ये Oxalate Crystals जमा होऊन किडणीची कार्य क्षमता कमी करु शकतात. AJKD तील संशोधन पत्रकाने पण अशी शक्यता सांगितली आहे. तसे बघितले तर Glyoxylic Acid चे skincare products (Cleaners, Toners, Serums, Moisturizer, ई.) मध्ये खुप जास्त प्रमाण नसते. एकूणच बघता ह्या विषयी अजून मोठ्या प्रमाणावर संशोधन करणे गरजेचे आहे. आपल्या त्वचा रोग तज्ञांच्या सल्ल्यानेच आपण skincare थेरपी घ्यावी; जेणेकरून व्यवस्थित उपचार होऊ शकतील.

  • डॉ. उर्मिला आनंद, अमृता हॉस्पिटल, फरिदाबाद

"केराटिन उपचारामध्ये फॉर्मल्डिहाइड होते, यामुळे केस, त्वचा आणि डोळ्यावर विपरित परिणाम होतो. यातील रासायनिक घटक रक्तप्रवाहात शोषले जातात. यामुळे किडनी खराब होऊ शकते. "

त्यांनी पुढे सांगितले आहे की, अमेरिकन जर्नल ऑफ किडनी डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका पेपरमध्ये असेच निष्कर्ष समोर आले आहेत. संशोधकांनी इस्रायलमधील 26 रूग्णांची पूर्वलक्ष्यीपणे ओळख पटवली ज्यांना केस सरळ करणारी उत्पादने निवडल्यानंतर गंभीर AKI (Acute Kidney Injury) चा अनुभव आला. “सात रुग्णांची किडनी बायोप्सी झाली, ज्याने 6 मध्ये इंट्राट्युब्युलर कॅल्शियम ऑक्सलेट डिपॉझिशन आणि 1 मध्ये ट्यूबलर पेशींमध्ये मायक्रोकॅल्सीफिकेशन प्रदर्शित केले,” असे अभ्यासात नमूद केले आहे.

इतकेच नाही तर ग्लायकोलिक ॲसिड हा क्लीनर, टोनर, सीरम आणि मॉइश्चरायझर्स यांसारख्या विविध उत्पादनांमध्ये आढळणारा एक सामान्य घटक आहे. यामुळे किडनीला धोका निर्माण करू शकतो, परंतु त्याचे परिणाम अनिर्णित आहेत. "स्किनकेअर प्रोडक्टमध्ये ग्लायकोलिक अॅसिडचे प्रमाण तितके जास्त नसते जितके ते केराटिन उपचारांमध्ये असते." केराटिन उपचार घेताना तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, प्रमाणित सलून आणि असे उपचार वारंवार करू नका असे डॉ. आनंद यांनी सांगितले आहे.

  • डॉक्टर महाजन, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार

"केराटिन उपचारामुळे त्वचा खराब होऊ शकते. ग्लायकोलिक अॅसिड स्किनकेअर प्रोडक्टमध्ये कमी प्रमाणात असते. यामुळे किडनीला धोका होतो याबाबत स्पष्ट सांगता येत नाही. पण केराटिन उपचारादरम्यान मास्क, हातमोजे वापरणे यासारखी काळजी घेणे गरजेचे आहे."

टिप: तुमच्या त्वचा रोग तज्ज्ञांशी संपर्क साधून पार्लमधील प्रोडक्ट वापरावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com