Right Floor In A Highrise : अपार्टमेंटच्या कोणत्या मजल्यावर फ्लॅट घेणं फायद्याचं ठरू शकतं, हा विचार तुम्ही केलाय का?

एकत्र कुटुंबासाठी कोणता फ्लॅट चांगला राहील?
Right Floor In A Highrise
Right Floor In A Highriseesakal

Right Floor In A Highrise : श्वेता आणि स्वप्निल 1BHK फ्लॅटमध्ये राहणारं एक जोडपं. दोघेही कमावते नेहा असिस्टंट मॅनेजर तर स्वप्निल इंजिनिअर. या दोघांचही प्रेमविवाह. सगळी सोयरीक जुळून आली मग घरच्यांनीही विरोध न करता लग्न उरकलं. लग्नाआधीच स्वप्निलने पुण्यात फ्लॅट घेतलेला. त्यामुळे ते दोघेही तिकडे शिफ्ट झाले. संसार तसा चांगलाच सुरू होता. पण अडचण होती ती फ्लॅटची.

फ्लॅट अगदीच तळमजल्यावर होता. तेव्हा कोणताही विचार न करता घेतलेला फ्लॅट आता वापरात आल्यानंतर डोकेदुखी बनत होता. कारण तळमजल्यावर फ्लॅट असलेल्यांची एक वेगळीच डोकेदुखी होते. तुम्हीही नवा फ्लॅट घेण्याच्या तयारीत असाल तर या गोष्टींवर एकदा नजर फिरवा. (Right Floor In A Highrise : Which floor to choose in a high-rise building)

Right Floor In A Highrise
Home Buying Selling : आता सुट्यांच्या दिवशीही घर खरेदी-विक्रीची नोंदणी

भारतात सगळ्यांनाच शहरात रहायचंय. जास्त लोकसंख्या अन् कमी जागा त्यामुळे भारतातील रिअल इस्टेट डेव्हलपर्स अपार्टमेंट्सचे मजले वाढवतच चालले आहेत. साधी माणसंही स्वत:च एक घरं असावं हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी फ्लॅट खरेदी करतात.

तसं पाहिलं तर सोसायटीचे सर्वात वर असलेले फ्लॅट आधी विकण्यात येतात. आणि सर्वात खालचे फ्लॅट हळूहळू बुक होतात.

टॉप फ्लोअरला फ्लॅट घेणं कधी फायद्याचं ठरेल?

अपार्टमेंटच्या बाहेर असलेले लोकेशन अतिशय प्रेक्षणीय असेल. समोर एखादा समुद्र, तलाव किंवा डोंगर असेल तर अगदी टॉपला असलेल्या फ्लॅटची निवड करणे योग्य राहील.

त्याचबरोबर तळमजल्यावर राहणारे लोक अनेकदा पार्किंगजवळ असल्याने उंदरांचे आगमन आणि सततच्या बाह्य आवाजामुळे त्रस्त होऊ शकतात. याशिवाय सूर्यप्रकाशाचा अभाव ही आणखी एक मोठी कमतरता असू शकते.

Right Floor In A Highrise
Home Buying Selling : आता सुट्यांच्या दिवशीही घर खरेदी-विक्रीची नोंदणी

रेंटल रिटर्न्स कुठे चांगले मिळतील

रेंटल रिटर्न्सचा विचार केला तर तळमजल्यावर असलेल्या फ्लॅट्सना जास्त मागणी आहे. जर तुमचा मजला खाली असेल तर तुम्हाला भाड्याचा चांगला परतावा मिळू शकतो. याचा अर्थ असा की आपण आपले घर भाड्याने देऊन चांगला नफा कमवू शकतो, कारण बऱ्यचदा भारतीय लोक ग्राऊंड फ्लोअरला राहणे पसंत करतात.

हवामानाचा विचार करा

फ्लॅट खरेदी करताना त्या ठिकाणचे हवामान कसे आहे. याचीही पूर्ण काळजी घ्यावी. त्या शहरात जास्त वायू प्रदूषण असेल तर ग्राऊंड फ्लोअरची निवड करा. मुंबई आणि बेंगळुरूमध्ये लोक वरच्या मजल्यावर घरे खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तर दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईमध्ये लोक ग्राऊंड फ्लोअरला घरे खरेदी करण्यास प्राधान्य देतात. (Buy Home)

अपार्टमेंटल एरियाचा विचार करा

तुमच्या अपार्टमेंटच्या भोवती गर्दीची ठिकाणे, जसा मार्केट किंवा मोठी शाळा, कॉलेज असतील तर त्याचा त्रास तुम्हाला होईल. त्यामुळे हवी तेवढी प्रायव्हसी आणि शांतता तुम्हाला मिळणार नाही.

Right Floor In A Highrise
Home Buying Tips : पत्नीच्या नावे घर घेणं, किधीही फायद्याचंच ठरतं, कसं ते वाचा

इलेक्ट्रिसिटीचा वापर

तुम्ही जितका जास्त टॉपचा फ्लॅट घ्याल तितकी इलेक्ट्रिसिटी जास्त वापरली जाईल. कारण, उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला बराच वेळ एअर कंडिशनर चालवावा लागतो. याशिवाय मोटारपंपालाही पाणी पोहोचविण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. (Home Loan)

एकत्र कुटुंबासाठी कोणता फ्लॅट चांगला राहील

तुम्ही एकत्र कुटुंबासाठी फ्लॅटची निवड करत असाल तर ग्राऊंड फ्लोअरला घर घेणं तुमच्यासाठी उत्तम ठरेल. सुरक्षिततेबरोबरच सोयीस्करही आहे. तसेच कुटुंबातील एखाद्याला चालता येत नसेल, गुढगेदुखी, किंवा घरी आजारी व्यक्ती असेल तर ग्राऊंड फ्लोअरला घर असणे कधीही चांगलेच राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com