Heatstroke : पाखरांमध्येही वाढला उष्माघाताचा धोका

Heatstroke : वाढत्या उन्हामध्ये पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातच प्रचंड उष्णता जाणवत आहे. उष्णतेचा पारा ४० अंशांपर्यंत गेला. त्यामुळेच पशुपक्षी घायाळ होत आहेत.
Heatstroke
HeatstrokeSakal

उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांना उष्माघात होत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत विविध भागांत अशा प्रकारे तीन पक्षी झाडांवरून खाली पडले. त्यांना प्राणिमित्र संघटनांनी वाचवले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. २५) मुले खेळत होती. त्यावेळी सोहन शिंदे, साक्षी शिंदे, अलिया खान या मुलांना पारव्याचे पिलू झाडावरून खाली पडलेले दिसले. एक मांजर त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, सतर्क असलेल्या या मुलांनी त्याला उचलून घेत पाणी पाजले, दाणेही टाकले. त्यानंतर त्यांनी या पारव्याला लाइफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांच्याकडे दिले.

या पिलाला बरे वाटल्यानंतर सोडून देण्यात आले. दुसऱ्या घटनेत चेलीपुरा येथे झाडावरून कोकिळा व एक चिमणी कोसळली होती. त्यांना हर्ष त्रिभुवन यांनी वाचवले व दोन्ही पक्ष्यांना लाइफ केअर संस्थेच्या स्वाधीन केले. तिसऱ्या घटनेत मोहनलालनगर परिसरात भर उन्हात उडणारे एक कबुतर खाली पडले. पण, जबर मार लागल्याने त्याला वाचविता आले नाही.

करा चारा-पाण्याची व्यवस्था

वाढत्या उन्हामध्ये पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातच प्रचंड उष्णता जाणवत आहे. उष्णतेचा पारा ४० अंशांपर्यंत गेला. त्यामुळेच पशुपक्षी घायाळ होत आहेत. श्वान, मांजरी व अन्य छोटे प्राणीही उन्हाच्या तडाख्याने हतबल झाले आहेत. ते खाद्यपदार्थांच्या शोधात भटकंती करताना दिसत आहेत.

Heatstroke
High Cholesterol: शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास अंडी खावी की नाही? जाणून घ्या तज्ञांचे मत

पशुपक्ष्यांना आपल्या व्यथा सांगता येत नाहीत, ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात, गच्चीवर, झाडाखाली पशुपक्ष्यांसाठी पाणी ठेवावे, शक्य असल्यास दाणेही टाकावेत, श्वानांना खाण्यासाठी द्यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

उन सतत वाढत आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांना व पाळलेल्या जनावरांनाही प्रचंड त्रास होत आहे. पक्षी झाडावरून पडलेले दिसत आहेत. असे पक्षी अथवा जनावरे जखमी अवस्थेत आढळल्यास लाइफ केअर संस्थेशी ८२०८१९७४७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

- जयेश शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com