Rose Day 2024 : आपल्या जोडीदाराला ऑनलाईन पद्धतीने गुलाब कसा पाठवायचा? जाणून घ्या ‘हे’ ऑप्शन्स

अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. उद्यापासून व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात होणार आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात ही 'रोझ डे' ने होणार आहे.
Rose Day 2024
Rose Day 2024esakal

Rose Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. उद्यापासून व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात होणार आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात ही 'रोझ डे' ने होणार आहे. रोझ डे निमित्त मार्केटमध्ये विविध प्रकारच्या गुलाबांची फुले दाखल झाली आहेत. रोझ डे ला आपल्या प्रियजनांना गुलाब देऊन हा दिवस साजरा केला जातो.

मात्र, जर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत राहत नसेल आणि कामानिमित्त ती व्यक्ती दूरच्या शहरात राहत असेल तर, मग तुमचा हा गुलाब त्या व्यक्तीपर्यंत कसा पोहचणार? असा प्रश्न तुमच्यातील काहीजणांना पडला असेल. 

परंतु, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत गुलाब पोहचवू शकता. त्यासाठी कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत? त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Rose Day 2024
Valentine Day 2024 : 'व्हॅलेंटाईन डे' ला पार्टनरसोबत थायलंडला जा फिरायला, IRCTC घेऊन आलंय कपल पॅकेज

आयजीपी

आयजीपी या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ‘रोझ डे’  च्या दिवशी गुलाब ऑर्डर करू शकता. या वेबसाईटद्वारे तुम्ही कोणत्याही शहरामध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रिय व्यक्तीपर्यंत तुमच्या बजेटमध्ये गुलाब पोहचवू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही आयजीपीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

सिटी फ्लॉवर्स

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही स्वस्त दरात गुलाब पाठवण्याचा विचार करत असाल तर ‘सिटी फ्लॉवर्स’ या वेबसाईटवर तुम्हाला कमी किंमतीमध्ये गुलाब मिळू शकतात. या वेबसाईटवर तुम्हाला गुलाबांचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.

मात्र, या वेबसाईटवर तुम्हाला किमान एक दिवस आधी ऑर्डर द्यावी लागेल आणि त्याचे प्री-बुकिंग करावे लागेल. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही सिटी फ्लॉवर्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

ब्लॉसमविला

ब्लॉसमविला हे एक ऑनलाईन फ्लॉवर शॉप आहे. या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला अनेक प्रकारचे गुलाब पाठवू शकता. रोझ डे च्या निमित्ताने विविध प्रकारचे गुलाब पाठवून तुम्ही तुमच्या जोडीदाराचे मन जिंकू शकता. येथे तुम्हाला अनेक प्रकारच्या फुलांचे पर्याय मिळतील. यासोबतच तुम्ही तुमच्या बजेटमध्ये हे गुलाब ऑर्डर करू शकता.

Rose Day 2024
Valentine Week : व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी पुण्याजवळील ही ठिकाणं आहेत बेस्ट, जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com