Russian girls beauty secrets: काय आहे रशियन महिलांच्या सौंदर्याचे घरगुती राज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russian girls beauty secrets

Russian girls beauty secrets: काय आहे रशियन महिलांच्या सौंदर्याचे घरगुती राज

रशियन महिला आणि मुली या सौंदर्याच्या यादीत आघाडीवर आहे. रशियन महिला किंवा मुली या खास त्यांच्या सौंदर्यामुळे ओळखल्या जातात. रशियन मुलीची त्वचेवर एक अनोख तेज आहे. शरीरांचा बांधा योग्य आहे त्यामुळे तिथल्या मुली चांगल्या उंच आहेत. सोबतच त्यांचे केस सुध्दा लांब आणि सुंद असतात. त्यामुळे रशियाच्या मुली महिलांसोबत तिथल्या सेलिब्रिटीदेखील तेवढ्याच सुंदर आहेत.

विशेष म्हणजे रशियातील जेनेटिक कंडीशन आणि भौगोलिक परिस्थिती त्यांच्या सौंदर्यामागे असल्याचे समजते. मात्र काही घरगुती उपायदेखील त्यांच्या सौंदर्यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियन महिला आपली त्वचा आणि केसांच्या सौंदर्याची खुप काळजी घेतात.

जस की रोज सकाळी उठल्यानंतर आपण पहिला ब्रश करतो आणि मग अंघोळ करतो अगदी तसाच नित्यनेमाने रशियन महिला मुली आपल्या सौदर्याची काळजी घेतात. डायटमध्ये काही हेल्दी फूडचा समावेश करतात. जाणून घेऊया त्यांच्या सौंदर्याचे रहस्य...

हेही वाचा: Home facial: घरच्या घरी करा 'हे' असे 4 प्रकारचे नॅचरल फेशियल

रशियन महिला त्यांच्या केसांच्या शायनिंगमुळे सुध्दा ओळखल्या जातात. रशियन महिला केसांच्या सौंदर्यासाठी कच्ची केळी मश करुन केसांना लावतात. आणि नंतर केस हे नैसर्गिक हवेत सुकवतात त्यामुळे त्यांच्या केसांच्या समस्या दूर होऊन केसांची शायनिंगदेखील वाढते.

त्या हेअर ड्रायर किंवा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरांना केस सुकवल्यासाठी वापर करत नाही. त्यामुळे त्यांचे केस लांब घनदाट आणि काळेभोर राहतात. रशियन महिला खास करून घरी तयार केलेला हेअर मास्क वापरता. त्यामुळे केमिकल आणि रसायणे यांच्या सोबत रशियन मुलींच्या केसांचा संबंध येतच नाही त्यामुळे त्यांचे केस हे नैसर्गिकरित्याच शायनिंग मारतात.

हेही वाचा: Health Tips : वजन कमी करण्यासाठी गरम पाणी किती प्यावे? जाणून घ्या

रशियन महिला त्वचेचे फेयरनेस वाढविण्यासाठी बटाट्याची पेस्ट, दूध आणि बदामाचे तेल एकत्र करू न तयार झालेल्या पॅकचा वापर करतात तसेच बर्फाच्या तुकडयांने चेहऱ्यावर रोज सकाळी हलकीशी मसाज करतात त्यामुळे चेहरा दिवसभर ताजा टवटवीत दिसतो. तसेच ज्यांना शक्य त्या रशियन महिला जेड रोलरचा देखील वापर करून चेहऱ्यावर मसाज करतात.

हेही वाचा: Gardening Tips: तुमच्या घरात 'या' तिन औषधी वनस्पती हव्याच

रशियन महिला आपली त्वचा गोरी होण्यासाठी दही आणि मधाचे फेस पॅक लावतात. त्यामुळे त्वचेची शायनिंग वाढविण्यासाठी रोज ‘कॅमोमाइल टी’चे सेवन करतात.

त्या वजन नियंत्रित ठेऊन स्लिम आणि फिट राहण्यासाठी रोज मिक्स व्हेजिटेबल सूपचे सेवन करतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. शिवाय पत्ताकोबी आणि पालकसारख्या भाज्यांचाही त्यांच्या डायटमध्ये समावेश असतो. रशियन महिला त्वचेचा ड्रायनेस दूर होण्यासाठी आणि ग्लो वाढविण्यासाठी अंड्यांच्या योकमध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करुन त्वचेवर लावतात. यामुळे त्वचेच्या समस्या दूर होऊन त्यांच्या सौंदर्यात भर पडते.

Web Title: Russian Girls Beauty Secrets What Are Russian Womens Beauty Home Secrets

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..