फॅशन-टॅशन : क्लिअर हिल्सची कमाल! 

फॅशन-टॅशन : क्लिअर हिल्सची कमाल! 

फॅशन ही केवळ कपड्यांपुरती मर्यादित नाही. त्यामध्ये अॅक्सेसरीज, हेअरस्टाइल आणि चप्पल हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक आउटफिटनुसार हे बदलते. शिवाय देशात आणि जगभरात फॅशन ट्रेंड हे सतत बदलत असतात. या वर्षीही फॅशनमध्ये आणखी भर पडली असून, एक नवा ट्रेंड समोर आला आहे. चप्पल, शूज आणि हिल्स असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण, हिल्समध्ये सध्या एक अनोखा ट्रेंड समोर आल्याचे दिसते. बाजारापासून सोशल मीडियापर्यंत सध्या चर्चा आहे ती ‘क्लिअर’ हिल्सची! काय आहे क्लिअर हिल्स? 

मुलींच्या वॉडरोबमध्ये प्रत्येक ड्रेसनुसार वेगवेगळ्या चपलांचे कलेक्शन हे असतेच. सध्याचा ट्रेंड मिस न करता क्लिअर हिल्स काय असतात हे जाणून घ्या. क्लिअर हिल्स म्हणजेच कोणताही रंग नसलेले पारदर्शक हिल्स. हे वाचताना तुम्हाला थोडे आश्‍चर्य वाटेल पण, या हिल्स कोणत्याही ड्रेससाठी एक चांगला पर्याय आहे. बाजारात आता क्लिअर हिल्समध्ये वेगवेगळे प्रकार आले आहेत. क्लिअर हिल्सच्या बेल्टमध्ये रंग उपलब्ध आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कशी कराल फॅशन? 
क्लिअर हिल्स सध्या सर्वत्र उपलब्ध आहेत. बॉक्स हिल्स, वेजेस, अॅंकल स्ट्रॅप हिल्स, प्लॅटफॉर्म हिल्स, पेन्सिल हिल्स आणि असे विविध प्रकार चपलांमध्ये उपलब्ध आहेत. पण, हे नव्या प्रकाराचे क्लिअर हिल्स कोणत्याही ड्रेसवर शोभून दिसणारे आहेत. ते पारदर्शक असल्याने कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर हे मॅच होतील. स्कर्ट, वन पिस, शॉर्ट्स अशा गुडघ्यावर असणाऱ्या ड्रेसवर कोणते हिल्स घालायचे असा प्रश्न नेहमीच समोर येतो. अशावेळी क्लिअर हिल्स हा एक उत्तम पर्याय आहे. 

कुठे मिळतील? 
तुमच्या जवळच्या बाजारामध्ये हे हिल्स अगदी सहजपणे मिळतील. ऑनलाइन खरेदीच्या अगदी प्रत्येक साइटवर चांगल्या दरात हे हिल्स उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीत ७०० ते १००० रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला हे हिल्स मिळतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com