Sad Leave Policy : मूड खराब असेल तर मिळते १० दिवस सुट्टी... 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 'Sad Leave'

Sad Leave Policy : चीनमधील एक सुपरमार्केट चेन 'फॅट डाँग लाइ' मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका वर्षात १० दिवसांची 'सॅड लिव्ह' देण्यात येत आहे
Sad Leave Policy  chinese firm grants 10 days of sad leave  Work-Life Balance marathi news rak94
Sad Leave Policy chinese firm grants 10 days of sad leave Work-Life Balance marathi news rak94

दररोजच्या आयुष्यात आपल्यापैकी बरेच जण दररोज कामावर जाण्याला कंटाळतात. कधी कधी काम करावंवाटत नाही, अशा परिस्थितीत सुट्टी देखील घ्यावी वाटते. पण बऱ्याचदा हे शक्य होत नाही. मात्र चीनमधील एक सुपरमार्केट चेन 'फॅट डाँग लाइ' मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका वर्षात १० दिवसांची 'सॅड लिव्ह' देण्यात येत आहे, विशेष म्हणजे यासाठी मॅनेजरची परवानगी घेण्याची देखील आवश्यकता नाही.

या सुट्ट्यांबद्दल बोलतना या सुपरमार्केट चेनचे चेरमन यू डाँग लाइ म्हणाले की, आयुष्यात प्रत्येकजण कधीतरी दुःखी होतो, हा मानवी स्वभावाचा भाग आहे. आमच्या कंपनीतील कर्मचारी मूड खराब असेल तर १० दिवसांची सुट्टी घेऊ शकतात. कर्मचारी त्यांना हवे तेव्हा सुट्टी घेऊ शकतात, यासाठी त्यांना मोकळीक देण्यात येते.

'सॅड लिव्ह' या कॉन्सेप्टबद्दल बोलताना यू यांनी सांगितलं की, जेव्हा कर्मचारी सॅड लिव्ह घेतात तेव्हा त्यांना लगेच प्रसन्न वाटू लागतं. याच्या माध्यमातून कंपनी त्यांच्या अडचणी समजून घेते आणि त्यांना पाठिंबा देते हा संदेश कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचतो. तसेच त्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांना हवे तेव्हा ही सुट्टी घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

Sad Leave Policy  chinese firm grants 10 days of sad leave  Work-Life Balance marathi news rak94
MI vs CSK: पराभवाचं दु:ख! शतकानंतरही मुंबई इंडियन्स हरल्यानंतर रोहितने एकट्यानेच धरली ड्रेसिंग रुमची वाट, Video Viral

यू यांनी पुढे बोलताना सांगितलं की, कर्मचारी ४० दिवसांपर्यात वार्षीक सुट्ट्या घेऊ शकतात. तसेच ककर्मचारी आठवड्यातून पाच दिवस काम करतात. या पाच दिवसात शिफ्ट सात तासांची असते. तसेच कर्मचाऱ्यांना काही खास परिस्थितींमध्ये ५,००० युआन पर्यंत भरपाई देखील देण्यात येते. यासोबतच चायनीज न्यू इयरनिमीत्त पाच दिवस सुपरमार्केट बंद असतं तेव्हा देखील कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. फॅट डाँग लाइ कंपनीत वर्क कल्चर इतरांपेक्षा वेगळं असून चीनच्या इतर कंपन्यांप्रमाने येथे 996 पॅटर्न फॉलो केला जात नाही. म्हणजेच कर्मचारी आठवड्याचे सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत काम करत नाहीत.

Sad Leave Policy  chinese firm grants 10 days of sad leave  Work-Life Balance marathi news rak94
Bhavesh Bhandari: कोण आहेत भावेश भंडारी? संन्यासी बनण्यासाठी केला 200 कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग

यू यांनी त्यांच्या सुपरमार्केट चैनमधील पहिलं स्टोअर १९९५ साली उघडलं होतं. त्यानंतर त्यांनी चीनच्या हेनान प्रोव्हेंसमध्ये याचा विस्तार केला असून सध्या त्यांचे १२ आउटलेट आहेत. फॅट डाँग लाय हे सुपरमार्केट जगभरातील इतर सुपरमार्केटप्रमाणे नसून येथे ग्राहकांची विशेष काळजी घेतली जाते. या सुपरमार्केटमध्ये ग्राहकांचे ब्लड प्रेशर तपासणे, हँडबॅग केअर यासोबतच पाळीव प्राण्यासाठी फिडींग स्टेशन देखील येथे देण्यात येतात. यासोबत मॅनिक्यूअर आणि बुट पॉलिश देखील करून दिलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com