Love Relationship ते लग्नाचा प्रवास यशस्वी पूर्ण करण्यासाठी सद्गुरूचा हा सल्ला नक्की वाचा

सद्गुरुंचे हे काही सल्ले नातेसंबंध टिकवण्यास फायदेशीर ठरतील.
Love Relationship
Love Relationshipesakal

Successful Love Relationship Tips : तरुण पिढी लव्ह अफेअर असणे हल्ली फार सामान्य आहे. मात्र बरेच लोक प्रेमसंबंधांमध्ये वेगवेगळे फायदे शोधत असतात. कदाचित त्यामुळेच प्रेमात फसवणूक झालेल्या प्रियकरांची संख्या सध्या जगात जास्त आहे. मात्र सगळी जोडपी फायद्यासाठी नात्यात असतात असंही नाही. अनेकांचं प्रेम हे खरंही असतं. आणि प्रेमासाठी ते लढायला, झटायलाही तयार असतात.

परंतु काहीवेळा हे नाते यशस्वी करण्यासाठी नात्यात दोघांनाही मेहनत घ्यावी लागते. रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये असे काही मुद्देही निर्माण होतात की, त्यांना स्वत:साठी वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात. लग्न हे प्रेमाचे गंतव्यस्थान मानले जात नसले तरी आयुष्यभर एकत्र राहणे हे एक अतिशय सुंदर आणि पवित्र बंधन आहे.

प्रत्येकजण एक दिवस आपल्या प्रियकराशी लग्नाचं नातं बांधण्याचे स्वप्न पाहतो. पण प्रेमाचं नातं लग्नापर्यंत कसं टिकवायचं अनेकांना कळत नाही. अशा वेळी सद्गुरुंचे हे काही सल्ले नातेसंबंध टिकवण्यास फायदेशीर ठरतील.

जगदीश वासुदेव उर्फ ​​सद्गुरुईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि योगी आहेत. आजच्या काळातील अशा धार्मिक गुरूंमध्ये त्यांची गणना होते, ज्यांना तरुण पिढीच्या समस्या चांगल्या प्रकारे समजतात आणि त्यांची मनं न दुखावता त्यांच्या समस्येवर मार्ग कसा दाखवावा हे त्यांना माहितीये.

प्रेमसंबंध सुधारण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्यांनी दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे नाते प्रत्येक अडचणीतून वाचवू शकता. यशस्वी करू शकता.

Love Relationship
Relationship Tips : या चुकांमुळे लग्न मोडतात, जया किशोरीने सांगितला आनंदी अन् सुखी नात्यांचा मंत्र

ही गोष्ट प्रेमसंबंधांना यशस्वी बनवेल

सद्गुरु सांगतात की जर तुम्हाला प्रेमप्रकरण यशस्वीपणे पुढे टिकवायचे असेल तर तुम्ही माघार घ्यायलाही शिकले पाहिजे. तुमचं नातं टिकवण्यासाठी कधी कधी माघारही घ्यावी लागेल.

असे करणे तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध असले तरी तुम्ही तुमचे प्रेम निवडले तर ते यशस्वी टिकवण्यासाठी तुम्ही सद्गुरूंचा हा सल्ला स्वीकारला पाहिजे. आणि जेव्हा रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या दोघांना ही गोष्ट कळते तेव्हा त्यांचे नाते कोणीही तोडू शकत नाही. ते प्रेम अमर होतं.

प्रेमात माघार घेणे म्हणजे काय?

आयुष्यात कधीही पराभूत होऊ नका, परंतु जर तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत तुमचे नाते दीर्घकाळ टिकवायचे असेल तर स्वत:ला माघार घेण्यापासून रोखू नका. असे मानले जाते की काही लढाया जिंकण्यासाठी एखाद्याला हरावे लागते. प्रेमही तसेच आहे. पण त्याआधी रिलेशनशिपमध्ये माघार घेण्याचा अर्थ जाणून घ्या.

सद्गुरु म्हणतात की प्रेमात प्रत्येकजण व्यवहाराबद्दल बोलतो. पण तुम्ही तुमचे नाते तेव्हाच यशस्वीपणे टिकवू शकता, जेव्हा तुम्ही त्यात माघार घेण्याचीही तयारी ठेवता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून जेवढ्या अपेक्षा ठेवता त्याच्या दुप्पट तुम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करा. असे केल्यानेच नात्यात प्रेम वाढते आणि टिकते.

Love Relationship
Relationship Tips : जोडपी एकमेकांवर प्रेम करतात तरीसुद्धा एकत्र आनंदी नाही? रविशंकरांनी सांगितलं कारण

असे लोक नातं टिकवण्यास असमर्थ असतात

सद्गुरु सांगतात की जर तुम्ही नेहमी इतरांकडून घेण्याची अपेक्षा केली तर कोणीही तुमच्याशी संबंध ठेवू इच्छित नाही.

आपण नेहमी स्वतःचा विचार करू नये. नातेसंबंधात, तुमच्या जोडीदाराकडून काही मूलभूत अपेक्षा असाव्यात, जसे की त्याने तुमच्याशी प्रामाणिक असावे, तुमचा आदर करावा, तुमचा स्वाभिमान दुखावू नये. याशिवाय अनावश्यक अपेक्षांचे ओझे त्याच्या खांद्यावर टाकणे म्हणजे आपले नातेसंबंध मुद्दाम बिघडवण्यासारखे आहे. (Lifestyle)

Love Relationship
Relationship Tips: पार्टनर वारंवार करतोय या 4 चुका तर व्हा अलर्ट! होऊ शकतं ब्रेकअप

यशस्वी लव्ह रिलेशनशिप कसे असावे

प्रेमसंबंधांचे यश प्रत्येक जोडप्यासाठी वेगळे असू शकते. काही लोक लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचून त्यांचे नाते यशस्वी मानतात, तर काही लोक त्यांच्या एकमेकांच्या मनातील आदराने खुश असतात. (Relationship Tips)

परंतु या सर्वांसाठी निरोगी नातेसंबंध खूप महत्वाचे आहेत. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा भागीदारांमध्ये प्रामाणिकपणा, विश्वास, आदर आणि मनमोकळे बोलण्याचे स्वातंत्र्य असेल. याशिवाय दोघेही प्रत्येक निर्णय एकत्र घेतात आणि कोणाच्याही स्वातंत्र्याला तडा जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com