Same Sex Marriage : अविवाहितांपेक्षा समलिंगी विवाहित जोडपे असतात अधिक आनंदी

सिंगल एलजीटीबी व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिकबाबतीत कमी दर्जाचे जीवन जगतात
Same Sex Marriage
Same Sex Marriageesakal

Same Sex Marriage : आतापर्यंत , विवाहाशी संबंधित बहुतेक अभ्यास विरुद्ध लिंगी कपलच्या बाबतीत केले गेले आहेत. पण नुकताच विवाहाशी संबंधित एक अभ्यास गे, लेस्बियन आणि बायसेक्शुअल लोकांबद्दल करण्यात आला. अभ्यासात असे दिसून आले आहे की समलैंगिक आवड असलेल्या लोकांवर लग्नाचा खूप सकारात्मक परिणाम होतो.

Same Sex Marriage
Meenatai Thackeray : पहिल्यांदाच मांसाहेब शिवसेनेच्या सभेला हजर झाल्या.. कारण होते राज ठाकरे

द जेरोन्टोलॉजिस्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाच्या अहवालात म्हटले आहे की, ज्या गे आणि लेस्बियन कपलनी लग्न केले, त्यांचे मानसिक आरोग्य असे न करणाऱ्यांपेक्षा खूपच चांगले असते. तसेच, ते अविवाहित लोकांपेक्षा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप चांगल्या स्थितीत आहेत.

Same Sex Marriage
Gajar Halwa Recipe: असा बनवाल गाजरचा हलवा तर बोटं चाटत रहाल...

वॉशिंग्टन विद्यापीठाचे जयन गोल्डसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1,800 हून अधिक लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर (LGTB) लोकांवर हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात समाविष्ट असलेले सर्व लोक 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते. विशेष म्हणजे 2014 साली अमेरिकेत समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली होती.

Same Sex Marriage
Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

सर्वेक्षणात सहभागी लोकांपैकी एक चतुर्थांश विवाहित होते. एक चतुर्थांश कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते आणि अर्धे अविवाहित होते. सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या विवाहितांनी त्यांच्या जोडीदारासोबत लग्नाची तब्बल २३ वर्षे घालवली आहेत. तर जे कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत ते किमान 16 वर्षे एकत्र असतात. अभ्यासात सामील झालेल्या लोकांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी विवाह केला.

Same Sex Marriage
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक विवाहित आहेत किंवा दीर्घकालीन कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत ते अविवाहित लोकांपेक्षा निरोगी आहेत. परंतु ज्यांनी विवाह केला आहे ते कमिटेड असले तरी विवाहित नसलेल्या लोकांपेक्षा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहेत. त्याच वेळी, सिंगल एलजीटीबी व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक यासह जवळजवळ प्रत्येक बाबतीत कमी दर्जाचे जीवन जगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com