Sarva Pitru Amavasya 2023 : घरात या गोष्टी दिसल्या तर समजून जा जवळपासच आहेत पितर, असा मिळवा त्यांचा आशीर्वाद

घरातील लाल मुंग्याही असू शकतील तुमचे पितर, खरं ते जाणून घ्या
Sarva Pitru Amavasya 2023
Sarva Pitru Amavasya 2023esakal

Sarva Pitru Amavasya 2023 : व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सगळे सोपस्कार पार पाडले जातात. आता या गोष्टी पाळल्या जातात. वर्षांला त्या स्थितीला त्यांचे श्राद्ध केले जाते. पितरांची काही इच्छा अपुरी असेल तर त्यावर अनेक उपाय शास्त्रात सांगितलेले आहेत.  

पूर्वीच्या काळातही पितरांची शांती केली जायची. पण, त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात मान्यता नव्हती. पण, आजकाल लोक प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींवर पितृशांती करतात. ज्यांना पितरांची मृत्यूतिथी माहिती नाही ते लोक सर्वपित्री अमावस्येला पितरांसाठी त्यांच्या आवडीचे नैवेद्य ठेवतात.  (Pitru Paksha 2023)

Sarva Pitru Amavasya 2023
Pitru Paksha: कावळ्याचा काव... काव...झाला दुर्मिळ! बदलत्या वातावरणामुळे ग्रामीण भागातही संख्येत घट

पितृपक्षाला म्हाळाचा महिना असेही म्हणतात. या पंधरावड्यात पितरांची शांतीसाठी श्राद्ध, म्हाळ, शांती केली जाते. जसे देवांचा उत्सव असताना देव पृथ्वीवर येतात असं मानलं जातं. तसच पितरही या दिवसात आपल्या घराजवळ, कुटुंबातील व्यक्तींजवळ घुटमळत असतात.

हे पितर उद्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्येलाही तुमच्या जवळपास भटकत असतील. त्यांना घाबरण्याची गरज नाही. उलट त्यांची काळजी घेऊन तूम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता.

Sarva Pitru Amavasya 2023
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात श्राद्ध पूजेसाठी बनवा ही खास चविष्ट खीर, लगेच नोट करा रेसिपी

तुम्हाला या गोष्टी पटो किंवा नको. पण याला शास्त्रीय बाजूही आहे. याबद्दलच पंडित सोमेश परसाई ज्योतिषी यांनी अधिक माहिती दिलीय.

पंडितजींच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला घराजवळ, किंवा घरात काही गोष्टी आढळल्या तर तुमचे पितर जवळपास आहेत असे समजावे. ते संकेत वेळीच ओळखून तुम्ही त्यावर उपाय करू शकता. 

घरात लाल मुंग्या झाल्या तर…

ज्योतिषी सांगतात की, पितृ पक्षाच्या काळात घरात भरपूर लाल मुंग्या दिसल्या तर ते पितरांच्या आसपास असण्याचेही लक्षण मानले जाते. तुमचे पूर्वज तुम्हाला मुंग्यांच्या रूपात भेटायला येतात. अशा स्थितीत मुंग्यांना पीठ खायला द्यावे. त्यांना साखर द्यावी. त्यांना घरातून घालवण्याची चूक करू नका.

Sarva Pitru Amavasya 2023
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात कावळ्याला एवढं महत्व का? त्यामागे आहे महत्वाचं कारण

अंगणातील तूळस सुकली तर

या काळात अंगणातील तुळस चांगली बहरली असेल तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृ पक्षाच्या काळात घरातील तुळशीचे रोप अचानक सुकायला लागले तर हे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुमच्या जवळच आहेत. तसेच ते नाराज आहेत. त्यामुळे पितरांच्या शांतीसाठी उपाय करावेत.

हा वृक्ष अचानक उगवला तर

हिंदू धर्मात पिंपळाच्या वृक्षाला महत्त्व आहे. कारण, पिंपळाच्या झाडावर पूर्वजांचाही वास्तव्य असते असे मानले जाते. पितृपक्षात अचानक घराजवळ पिंपळाचे झाड उगवले तर ते पितरांच्या आजूबाजूला असण्याचे लक्षण आहे. अशा वेळी पिंपळाच्या झाडावर जल अर्पण करून पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करावेत.

पिंपळाच्या झाडावर पूर्वजांचाही वास्तव्य असते
पिंपळाच्या झाडावर पूर्वजांचाही वास्तव्य असतेesakal
Sarva Pitru Amavasya 2023
Ramdas Boat Accident: 76 वर्षांपूर्वीची गटारी अमावस्या ! रामदास बोट दुर्घटनेने कोकणाच्या सागरी वाहतुकीचे स्वरूपच बदलून गेले

काळ्या कुत्र्याचे दर्शन झाल्यास

श्राद्धाच्या दिवसांत अचानक घराभोवती काळा कुत्रा दिसला तर ते तुमच्या आजूबाजूला पितरांच्या सहवासाचे लक्षण असू शकते. पितृ पक्षाच्या काळात काळ्या कुत्र्याला पूर्वजांचे दूत मानले जाते. या दिवसात काळा कुत्रा दिसणे शुभ लक्षण आहे. म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहेत.

कावळ्याच्या रूपात येतात

पितृ पक्षात कावळ्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवसांमध्ये पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि तुम्ही दिलेले अन्न घेतात. पितृ पक्षात जर कावळा तुमच्या घरी आला आणि अन्न खात असेल तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांची तुमच्यावर कृपादृष्टी आहे.

(सूचना: या बातमीत दिलेली सर्व माहिती तथ्य आणि गृहितकांवर आधारित आहेत. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही तथ्याची पुष्टी करत नाही.)

पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात
पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतातesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com