Saving Schemes : गृहिणींनो तांदळाच्या डब्यात पैसे साठवून डबल होणार नाहीत, पण इथे नक्की होतील ! Saving Schemes : best saving schemes for housewives in marathi discover psk95 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saving Schemes

Saving Schemes : गृहिणींनो तांदळाच्या डब्यात पैसे साठवून डबल होणार नाहीत, पण इथे नक्की होतील !

Saving Schemes : नवऱ्याच्या हालाखीच्या परिस्थितीत घरातील गृहलक्ष्मीने साठवलेले पैसे कामी येतात. तिच्याकडे पैसे मागितले की ती पर्स नाही तर सगळे डबे शोधू लागते. कारण, तिने साठवलेले पैसे चोरांनाही सापडणार नाहीत अशा ठिकाणी असतात. लोक म्हणतात की महिला खर्च खूप करतात. पण, हेही तितकच खरं आहे की त्याच सेव्हिंगही जास्त करतात.

गृहिणी केवळ घर सांभाळत नाहीत तर वेळ पडल्यावर त्यांच्या बचतीतून आर्थिक मदतही करतात. ही बचत अनेक दिवसांत अल्प प्रमाणात बचत केलेल्या पैशातून होते. गृहिणींची इच्छा असल्यास त्या आपल्या लहान बचतीचे मोठ्या निधीत रूपांतर करू शकतात.

यासाठी त्यांना असे गुंतवणुकीचे पर्याय निवडावे लागतील जिथे किमान गुंतवणुकीची रक्कम कमी असेल आणि परतावा चांगला असेल. आज आपण येथे अशा काही गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल बोलणार आहोत. या पर्यायांद्वारे, तुम्ही केवळ पैशांची बचतच करणार नाही तर ते पैसे वाढवू शकाल.

पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, म्युच्युअल फंड एसआयपी आणि रेकरिंग डिपॉजिट या अशा काही योजना आहेत ज्या महिलांची सेव्हिंगमध्ये जास्त मदत करू शकतात. याबद्दलच अधिक माहिती घेऊयात.

महिला सन्मान बचत योजना

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत महिला 1,000 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकतात. यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याचे व्याजदर सरकार ठरवते. सध्या त्यावर ७.५ टक्के वार्षिक दराने व्याज दिले जात आहे. अगदी लहान गुंतवणुकीसाठी ही एक उत्तम योजना आहे. (Money saving tips)

रेकरिंग डिपॉजिट

महिला रेकरिंग डिपॉजिट किंवा आरडीमध्ये गुंतवणूक करूनही चांगली रक्कम उभी करू शकतात. यामध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी हजार रुपयांचीही गरज नाही. गृहिणी अवघ्या 100 रुपयांपासून आवर्ती ठेवींमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.

यावर वेगवेगळ्या संस्थांकडून वेगवेगळे व्याज दिले जाते. उदाहरणार्थ, SBI त्यावर 7 टक्के व्याज देत आहे, तर पोस्ट ऑफिस त्यावर 6.5 टक्के व्याज देत आहे.

म्युच्युअल फंड

जर तुम्हाला थोडीशी जोखीम घेऊन वरील दोन पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळवायचा असेल, तर म्युच्युअल फंड SIP तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. दरमहा 500 रुपये गुंतवून तुम्ही 7 टक्के ते 12 टक्के किंवा त्याहूनही अधिक परतावा मिळवू शकता. दीर्घकाळात हा एक मोठा निधी बनू शकतो. (Mutual Funds)

टॅग्स :moneywomenSakal Money