Ambani Family महिलांचं डिझायनर कलेक्शन....बॅग्स आणि कपड्यांची किंमत ऐकून व्हाल थक्क

सोशल मीडियावर आपण अनेकदा अंबानी कुटुंबियाच्या महिलांचे फोटो पाहतो. यावेळी त्यांच्या साड्या किंवा परिधान केलेले कपडे, त्यांचे दागिने आणि बॅग्स सगळंच लक्षवेधी असतं.
Ambani Family Designer Collecti
Ambani Family Designer Collecti Esakal
Updated on

जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी कुटुंबाच नाव सामील होतं. अर्थातच भारतीतील स्रवाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी हे नाव आघाडीवर आहे. एखादा समारंभ असो किंवा पार्टी अंबानी कुटुंबात प्रत्येक सण समारंभ देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर अंबानी कुटुंबातील महिला देखील या सण समारंभांत उत्साहाने सहभागी होताना दिसतात. See Designer Collection of Ambani Family women members

सोशल मीडियावर आपण अनेकदा अंबानी कुटुंबियाच्या Ambani Family महिलांचे फोटो पाहतो. यावेळी त्यांच्या साड्या किंवा परिधान केलेले कपडे, त्यांचे दागिने Jewlery आणि बॅग्स सगळंच लक्षवेधी असतं.अंबानी कुटुंबियातील मुकेश अंबानींच्या आईंपासून ते नीता अंबानी, त्यांची विवाहित मुलगी ईशा ते लवकरच त्याच्या कुटुंबात सामिल होणारी राधिका सगळ्यांचा स्टाइलिश अंदाज खुपच खास आहे.

कायमच डिझायनर कपडे आणि दागिन्यांमध्ये या महिलांना पाहिलं जातं. अनेक महिलांना अंबानी कुटुंबियातील या महिलांच्या वॉर्डरोबबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते.  तेव्हा आज आम्ही तुम्हाला त्यांच्या काही वॉर्डरोबद्दल सांगणार आहोत. म्हणजेच त्यांचे कपडे किंना एक्ससरिज आणि त्यांच्या किंमतींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कोकिला बेन अंबानी- मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन अंबानी यांना फॅन्सी आणि महागड्या बॅग्सची आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये चॅनल ब्रॅण्डची २३ लाख रुपये किंमत असलेली बॅग आहे. तसचं Hermes ब्रॅण्डची क्रोकोडाइल लेदर बॅग आहे. या बॅगची किंमत तब्बल ५५ लाख इतकी आहे. तसंच प्राडा, गोयार्ड, GUCCI तसचं डॉल्सी एण्ड गबाना यांसारख्या अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या लाखो रुपये किमतीच्या छोट्या मोठ्आ बॅग्स आणि हॅण्ड बॅगचं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. 

नीता अंबानी-  नीता अंबानींना देखील कायमच डिझायनर कपड्यांमध्ये पाहायला मिळतं. नीता अंबानींच्या क्लॉसेटमध्ये ४० लाख रुपये किमतीच्या साडीपासून ते Ysl ब्रॅण्डच्या ८० लाख रुपये किमतीची हील्स पाहायला मिळतील. Ysl हे नीता अंबानी यांचं आवडतं ब्रॅण्ड आहे. त्यामुळे या ब्रॅण्डच्या अनेक सॅण्डल्स आणि हील्स त्यांच्याकडे आहेत. Neeta Ambani bag collection

श्लोका अंबानी- तर नीता अंबाई यांची मोठी सून श्लोकादेखील खूपच फॅशनेबल आहे, वेगवेगळ्या बड्या ब्रॅण्डचे कपडे तसचं सॅण्डल आणि बॅग्स तिच्याकडे आहेत. नुकतचं तिला मनिष मल्होत्राच्या एका इव्हेंटमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी तिने त्याने डिझाइन केलेली साडी परिधान केली होती. या साडीची किंमत २ लाख ७० हजार रुपये असल्याचं बोललं जातंय. तसचं एका इव्हेंटवेळी श्लोकाने एक काळ्या रंगाचा पार्टीवेअर जंपसूट परिदान केला होता.

या ड्रेसची किंमत जवळपास ५ लाख एवढी आहे. तर यावेळी तिने Judith leiber ब्रॅण्डचं एक क्लच हातात घेतलं होतं. या क्लचची किंमत ५९९५ डॉलर म्हणजेच जवळपास ४ लाख ८८ हजार इतकी आहे. तर नीता अंबांनी यांच्या प्रमाणेच श्लोकाला देखील महागड्य़ा बॅग्सची आवड आहेच. श्लोकाकडे देखील Hermes ब्रॅण्डची एक मिनी एप्सम बबलगम हॅण्ड बॅग आहे. या बॅगची किंमत २९ लाख ४४ हजार इतकी आहे. Shloka ambani designer collection  

इशा अंबानी- मुकेश अंबानी यांची एकुलती एक लाडकी लेक इशा अंबानीदेखील स्टायलिश राहणं पसंत करते. इशाकडे वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्हीचं मोठं कलेक्शन आहे. मात्र इशा अंबानीला तिच्या खासगी गोष्टींचं शोऑफ करण्याची आवड नाही. 

राधिका मर्चंट- तर अंबानी कुटुंबात आता लवकरच सामील होणाऱ्या राधिका मर्चंटला कायमच डिझायनर कपड्यांमध्ये स्पॉट केलं जातं. काही दिवसांपूर्वीच तिला फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसलाच्या पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी तिने सुंदर अशी साडी परिधान केली होती. यावेळी तिच्या हातात Hermes ब्रॅण्डची एक गुलाबी मिनी एलिगेटर लेदर बॅग कॅरी केली होती. या बॅगची किंमत एकूण कदाचित तुमचं डोकं चक्रावेल. या बॅगची किंमत ५८ हजार ६०० अमेरिकन डॉलर एवढी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये या बॅगची किंमत जवळपास ४८ लाख एवढी आहे.

तर अंबानी कुटुंबातील सर्वच महिला अनेक सेलिब्रिटीजच्या लग्नसोहळा किंवा पार्टी किंवा एखादा सण कायम डिझायरन कपडे आणि दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com