Silver मूर्ती आणि दागिन्यांचा काळेपणा घालवा या ट्रीक्सने केवळ ५ मिनिटांमध्ये

आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी चांदीच्या वस्तूंचा काळपटपणा दूर करू शकता. यामुळे तुमच्या चांदीच्या मूर्ती किंवा दागिने पुन्हा नव्या सारख्या चमकू लागतील
चांदीच्या दागिन्यांची सफाई
चांदीच्या दागिन्यांची सफाईEsakal
Updated on

घरातील चांदीच्या मूर्ती, दागिने किंवा भांडी Silver Idols and ornamentsही कालांतराने काळी पडू लागतात. तसंच त्यांची चमकदेखील कमी होवू लागते. चांदीमध्ये असलेल्या सल्फरचा हवेशी संपर्क आल्यामुळे चांदीच्या वस्तू काळ्या पडतात. बऱ्यादचा चांदीच्या वस्तू वापरात न आल्याने त्या इतक्या काळ्या होतात की त्या पुन्हा चमकवणं खूपचं कठीण होतं. Smart Marathi Tips and Tricks for Cleaning Silver ewellery at Home

चांदीच्या मूर्ती किंवा दागिने आणि वस्तू स्वच्छ करायला गेल्यानंतर त्या बऱ्याचदा पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. नाजूक नक्षीकाम असलेल्या जागी तसचं कोपऱ्यामध्ये स्क्रबर न पोहचल्याने तिथे काळपटपणा कायम राहतो. 

चांदींच्या काळ्या पडलेल्या वस्तू Silver Ornaments पुन्हा चमकवण्यासाठी आपण बऱ्याचदा सोनाराकडे जातो. यामुळे त्या पुन्हा चमकू लागलातात. मात्र कालांतराने त्या पुन्हा काळ्या होतातच. यामुळे प्रत्येकवेळी सोनाराकडे Goldsmith जाणं शक्य नसतं. शिवाय खर्च देखील होतो. यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी चांदीच्या वस्तूंचा काळपटपणा दूर करू शकता. यामुळे तुमच्या चांदीच्या मूर्ती किंवा दागिने Ornaments पुन्हा नव्या सारख्या चमकू लागतील. Tips to clean silver

बेकिंग सोडा- बेकिंग सोडाच्या मदतीने तुमचे काळे पडलेले चांदीचे दागिने पुन्हा चमकू लागतील. स्टर्लिंग सिल्वर ज्वेलरीला साफ करण्यासाठी दोन चमचे बेकिंग सोडामध्ये एक चमचा पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट हलक्या हाताने दागिन्य़ावर स्क्रब करा. त्यानंतर ही पेस्ट १०-१५ मिनिटे दागिन्यावर राहू द्या. ही पेस्ट वाळल्यानंतर दागिना स्वच्छ धुवुन घ्यावा. त्यानंतर सुती कपड्याने किंवा टॉवेलने स्वच्छ करावा. बेकिंड सोडा नसल्यास तुम्ही कॉर्नस्टार्चदेखील वापरू शकता. how to clean silver jewlery. 

टुथपेस्ट- टुथपेस्टने केवळ दातचं स्वच्छ होवून चमकत नाही तर याचा उपयोग करून तुम्ही चांदीचे दागिने, मूर्ती किंवा इतर वस्तूही चमकवू शकता. एखाद्या जुन्या ब्रशवर टुथपेस्ट घेऊन चांदीच्या वस्तूवर चांगलं स्क्रब करा. त्यानंतर ही वस्तू १० मिनिटे गरम पाण्यात ठेवा. त्यानंतर गरम पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि सुती कापडाने पुसा. टुथपेस्टच्या मदतीने चांदीच्या वस्तू पुन्हा नव्याप्रमाणे चमकण्यास मदत होते. 

हेअर कंडीशनर- केसांना चमक देण्यासाठी वापरण्यात येणारं हेअर कंडीशनर तुमच्या चांदीच्या वस्तूंची चमक पुन्हा मिळवून देईल. थोडसं कंडीशनर एखाद्या टुथपेस्टच्या मदतीने चांदीच्या वस्तूवर चांगल्या प्रकारे स्क्रब करा. कंडीषशनरने चांदीच्या वस्तू घासल्यास त्यांच्यावरील काळा थर निघून जाण्यास मदत होईल. 

हे देखिल वाचा-

चांदीच्या दागिन्यांची सफाई
freezer cleaning : फ्रिजरमध्ये वारंवार बर्फाचा पर्वत बनतो? या सोप्या ट्रिक्स ट्राय करा अन् फ्रिज ठेवा स्वच्छ

टोमॅटो सॉस-  टोमॅटोचा सॉस वापरूनही चांदीच्या वस्तू स्वच्छ करणं शक्य आहे.  यासाठी चांदीच्या वस्तूवर सॉस चांगल्याप्रकारे पसरवून लावा. त्यानंतर जवळपास २० मिनिटं सॉस वस्तू वर राहू द्या. त्यानंतर ही वस्तू ब्रशने चांगली घासून गरम पाण्याने धुवा. यामुळे चांदी स्वच्छ होईल. clean silver at home

हॅन्ड सॅनिटायझर- करोना काळात विषाणूंपासून सुरक्षा व्हावी यासाठी आपण वेळोवेळी हाताला सॅनिटायझर लावून सुरक्षा बाळगत होतो. एवढचं काय तर सॅनिटायझर स्प्रेचा शक्य तिथे वापर करत होतो. करोना काळ संपला असला तरी आता हॅण्ड  सॅनिटाझरचा वापर अनेकजण करत आहेत. याच हॅण्ड सॅनिटायझरच्या वापराने चांदीच्या जुन्या वस्तू नव्या सारख्या चमकण्यास मदत होवू शकते. हॅण्ड सॅनिटाझरला एखाद्या वाटी किंवा भांड्यात घ्या. यात चांदीची वस्तू जवळपास १५ मिनिटं भिजवून ठेवा. १५ मिनिटांनंतर वस्तू ब्रशने चांगली स्क्रब करा आणि पुन्हा सॅनिटायझरमध्ये ठेवा. १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने ही वस्तू धुवा आणि पहा कमाल. तुमची चांदीची वस्तू पुन्हा नव्या सारखी चमकू लागेल. 

अॅल्युमिनियम फॉइल- जेवण किंवा पदार्थ ताजे ठेवण्यासाठी अनेक घरांमध्ये अॅल्युमिनियम फॉइल वापरली जाते. या फॉइलच्या मदतीने आपण चांदीच्या भांड्याचा काळपट थर दूर करू शकतो. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या. यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा टाका. आता चांदीच्या वस्तू भांड्यातील पाण्यात टाका. काही वेळ वस्तू भांड्यात राहू द्या. त्यानंतर अॅल्यूमिनियम फाइलचा एक बोळा तयार करून या बोळ्याने वस्तू घासा. यामुळे चांदी स्वच्छ होण्यास मदत होईल.

लिक्विड सोप- आपल्या नेहमीच्या वापरातील लिक्विड सोपनेही चांदीची भांडी स्वच्छ होणं शक्य आहे. माात्र यासाठी थोडी वेगळी पद्धत वापरणं गरजेचं आहे. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात लिक्विट सोपचे काही थेंब टाका.  या गरम साबण्याच्या पाण्यात जवळपास १० मिनिटं चांदीची वस्तू भिजत ठेवा. त्यानंतर एका सॉफ्ट ब्रशने चांदीची वस्तू घासून ती स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चांदीचा काळेपणा दूर होवून चांदी चमकू लागेल. 

अशा प्रकारे काही घरगुती सामग्रीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी चांदीच्या वस्तूंवर आलेला काळा थर दूर करून त्या पुन्हा चमकवू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com